News Flash

मोटारविक्रीचे अमिष दाखवून फसवणूक

ग्रामीण भागात टोयाटो कंपनीच्या मोटारी लवकर मिळत नाही, असे सांगत ८ ते १० गाडय़ा विकून देण्याचे अमिष दाखवून कंपनीला टोपी घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका

| January 13, 2015 08:47 am

ग्रामीण भागात टोयाटो कंपनीच्या मोटारी लवकर मिळत नाही, असे सांगत ८ ते १० गाडय़ा विकून देण्याचे अमिष दाखवून कंपनीला टोपी घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका संशयिताविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पध्दतीने कंपनीला गंडविण्याचा बहुदा असा पहिलाच प्रकार असावा. बाजारात ज्या मोटारींना मागणी आहे, त्यांची नोंदणी करूनही त्या लवकर उपलब्ध होत नसल्याचे लक्षात घेऊन संशयिताने हा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दीपक वाबळे या व्यक्तीने कंपनीच्या नावाचा वापर केल्याची तक्रार देण्यात आली आहे. ग्रामीण भागात टोयाटो कंपनीची वाहने लवकर मिळत नाही. या वाहनांवर कर्ज आणि विमा करून देतो, त्याबदल्यास दलाली मिळते म्हणून ८ ते १० मोटारी विक्री करून देईल, अशी खोटी माहिती वाबळेने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कंपनीचे नाव वापरून संबंधिताने कंपनीची फसवणूक केली, असे तेजिंदरसिंग बेदी यांनी तक्रारीत म्हटले आहे. जी वाहने मिळविण्यासाठी ग्राहक प्रयत्न करतात, ज्या वाहनांची नोंदणी करूनही ती लवकर उपलब्ध होत नाहीत, अशा वाहनांवर संशयिताने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते.
या माध्यमातून कंपनीसह ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. शहरात गेल्या काही वर्षांत फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल होत असून त्यात या नव्या प्रकाराची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:47 am

Web Title: fraud makeing in nashik
टॅग : Fraud,Loksatta,Nashik,News
Next Stories
1 देवळाली छावणी मंडळावर भाजप-रिपाइंचा झेंडा
2 धार्मिक ठिकाणांच्या स्वच्छतेत पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश
3 न्यायालयीन निकालामुळे स्थायी समितीत काँग्रेसची ‘गोची’ निश्चित
Just Now!
X