रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने डीजीपीनगरमधील सरस्वती विद्यालयातील पाचवी ते सातवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २०० विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या वेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे प्रभाकर दवंडे, सचिव सरिता नारंग, मराठी माध्यमाचे अंजली प्रधान, बाल मुक्तांगणचे अध्यक्ष विलास प्रधान, रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे प्रकल्प प्रमुख कॅप्टन सुरेश आव्हाड, डॉ. रवी निकम, डॉ. नितीन गडकरी, डॉ. मनिषा जगताप, अमरजीतसिंग गरेवाल, मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कॅप्टन सुरेश आव्हाड यांनी क्लबच्या कार्याची व  विविध उपक्रमाची माहिती करून दिली. सरस्वती विद्यालयातील बहुतेक विद्यार्थी कामगारांची मुले असून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ  नये,  यासाठी रोटरी क्लबमार्फत शाखेच्या मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे यांनी रोटरीचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांच्याकडे केलेल्या सूचनेवरून हा उपक्रम राबविण्यात आला.