चिपळूण येथे राहणाऱ्या रझिया चोगले या ५७ वर्षांच्या महिलेला जायण्ट इन्ट्राक्रॅनियल या विकाराने ग्रासले असून त्यांच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयाचे डॉ. उदय लिमये उपचार करीत आहेत.
विधवा असलेल्या रझिया चोगले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न वर्षांला ३० हजार रुपये इतके अल्प असून वैद्यकीय उपचारांसाठी अंदाजे ९ लाख ६५ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. म्हणून दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. दात्यांनी आपले धनादेश अथवा डिमाण्ड ड्राफ्ट्स ‘डीन, पीबीसीएफ, केईएम हॉस्पिटल’ या नावाने पाठवावा.