News Flash

महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधील दास सेक्टर येथे सीमेवर गस्त घालत असताना निधन झालेल्या मधुकर श्रीकांत महाडिक या जवानाच्या पाíथव देहावर रविवारी सकाळी शिपूर (ता. मिरज) येथे शासकीय इतमामात

| August 12, 2013 01:54 am

जम्मू-काश्मीरमधील दास सेक्टर येथे सीमेवर गस्त घालत असताना निधन झालेल्या मधुकर श्रीकांत महाडिक या जवानाच्या पाíथव देहावर रविवारी सकाळी शिपूर (ता. मिरज) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मधुकर महाडिक यांना लष्करी जवानाच्या तुकडीने अखेरची सलामी दिली.
जवान महाडिक हे दास सेक्टरमध्ये गुरुवारी रात्रीची गस्त घालीत असताना हृदयविकाराने मृत्यू पावले. आज त्यांचे पाíथव मूळ गावी शिपूर येथे आणण्यात आले. अंत्यविधीसाठी स्वतंत्र मदान गावकऱ्यांनी तयार केले होते. जवान मधुकर महाडिक यांना शासनाच्या वतीने वीरचक्र अर्पण करण्यात आले. महाडिक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अडीच हजार लोक वस्तीचा शिपूर गाव िलगनूर रस्त्याला जमला होता. याशिवाय आसपासच्या एरंडोली, बेळंकी, िलगनूर, मल्लेवाडी, आरग आदी गावातील लोकही हजर होते. मधुकर महाडिक यांच्या पाठीमागे आई, वडील,भाऊ,पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी आराध्या असे कुटुंब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:54 am

Web Title: funeral on mahadik
Next Stories
1 शिराळ्यात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी
2 धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; दोघांना पोलीस कोठडी
3 कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ७ हजारांची मागणी
Just Now!
X