27 October 2020

News Flash

‘गदिमा’ नव्या स्वरूपात रसिकांच्या भेटीला!

‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ अर्थात कवी ग. दि. माडगूळकर यांच्यावरीलwww.gadima.com हे संकेतस्थळ पुन्हा नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे.

| June 14, 2014 06:21 am

‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ अर्थात कवी ग. दि. माडगूळकर यांच्यावरीलwww.gadima.com हे संकेतस्थळ पुन्हा नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. ‘गदिमां’चे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर आणि त्यांची पत्नी प्राजक्ता यांच्या प्रयत्नातून हे संकेतस्थळ तयार झाले आहे. या संकेस्थळासह  www.madgulkar.com आणि www.geetramayan.com. ही दोन संकेतस्थळेही पाहता येणार आहेत.   या संकेतस्थळावर गदिमांची ७२५ गाणी एमपी३ स्वरूपात देण्यात आली आहेत.
२०१४-१५ हे ‘गीतरामायणा’चे हीरक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने ‘संस्कृत गीतरामायण’ ध्वनी स्वरूपात संकेतस्थळावर देण्यात आले आहे. गदिमांच्या आयुष्यातील काही प्रसंग, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या आठवणी, किस्से गदिमांचे सुपत्र श्रीधर आणि नातू सुमित्र यांनी लिहिले असून तेही येथे वाचता येणार आहेत.
गदिमांची काही लोकप्रिय गाणी संगीतकार नंदू घाणेकर यांनी नव्याने संगीतबद्ध केली असून त्याचे संगीत संयोजन संगीतकार अजय-अतुल यांनी केले आहे. ‘अगदी आज’ या शीर्षकाअंतर्गत ही गाणी ऐकता येतील.

संकेतस्थळाची खास वैशिष्टय़े
* गदिमांची ७२५ गाणी एमपी-थ्री स्वरूपात ऐकता येणार  
* सुधीर फडके, माणिक वर्मा,     लता मंगेशकर, गजानन वाटवे, ललिता देऊळकर-फडके यांच्या आवाजातील मूळ गीतरामायण
* गदिमांच्या कवितांवर सुलेखनकार  भालचंद्र लिमये यांनी केलेले सुलेखन
* गदिमांच्या ‘जोगिया’सह अन्य कविता दस्तुरखुद्द त्यांच्याच आवाजात ऐकता येणार
* गदिमांचे ‘गीतगोपाल’ही संकेतस्थळावर.     संगीत- सी. रामचंद्र आणि यशवंत देव.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 6:21 am

Web Title: gadima com in new form
Next Stories
1 स्वेच्छेने पोटगी नाकारल्यानंतरही पत्नीचा पोटगीचा अधिकार अबाधितच!
2 ‘देवराष्ट्रा’त होणार यशवंतरावांचे स्मारक!
3 वाहनचोरांच्या टोळीला अटक
Just Now!
X