महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता कामगार मेळावा शहरातील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव व्ही. डी. ठाणगे यांनी दिली. मेळावा विभागीय सचिव टी. व्ही. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, व राज्य सरचिटणी रणजीत देशमुख, नागपुर विभागाचे अध्यक्ष रवी बारई, नाशिक विभाग अध्यक्ष सुभाष हंडोरे, पुणे विभागाचे दिलिप कोरडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मावितरणमध्ये काम करताना कामगारांवर येणारा वाढता ताण, दैनंदिन जबाबदाऱ्या, कंत्राटदारांच्या कामांची घसरलेली गुणवत्ता व त्यातुन होणारे अपघात, नगरचा पायलट प्रोजेक्ट, आमागी पगारवाढ याविषयावर चर्चा होणार आहे.