News Flash

हप्ते मिळत असल्याने आमचे व्यवसाय खुलेआम सुरू

पोलीस व मटका व्यावसायांचे अंतर्गत लागेबांधे आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात मटका खुलेआम सुरू असतो. पोलिसांकडून केली जाणारी कारवाई तत्कालीन व बेगडी स्वरूपाची असते. त्यांना दरमहा

| February 25, 2013 10:00 am

पोलीस व मटका व्यावसायांचे अंतर्गत लागेबांधे आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात मटका खुलेआम सुरू असतो. पोलिसांकडून केली जाणारी कारवाई तत्कालीन व बेगडी स्वरूपाची असते. त्यांना दरमहा हप्ता मिळत असल्याने मटका बंद व्हावा, असे वाटत नाही, जिल्ह्य़ात दरमहा अडीच कोटी रुपयांचा हप्ता मटका व्यावसायातून पोलिसांना मिळत असतो असा गौप्यस्फोट मटकाबुकी विजय पाटील याने सोमवारी पत्रकार परिषदेत केला. एखाद्या मटकेवाल्याने उघडपणे पत्रकार परिषद घेऊन मटका व्यवसाय व त्यातून पोलिसांशी निर्माण झालेले हितसंबंध यावर प्रथमच जाहीरपणे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.    
गेल्या १२ वर्षांपासून मटका व्यवसायामध्ये मी कार्यरत आहे, असा उल्लेख करून विजय पाटील याने सांगितले, की आतापर्यंत माझ्यावर पोलिसांनी मटक्याच्या कारवाईतून ११० वेळा गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ९० वेळा मी निर्दोष सुटलो आहे. मटक्याच्या गुन्ह्य़ातून निर्दोष सुटण्याचे प्रमाण खूपच जादा असून त्याला पोलिसांचे तपास पथक कारणीभूत आहे. असे मटक्याचे खटले सुरू झाल्यावर पंच फितूर होतात. अनेकदा पोलीस हेच पंच म्हणून सही ठोकतात. अशाप्रकारे पोलिसांना खरोखरच मटका व्यावसायिकांवर कारवाई करायची असेल, तर प्रथम नेहमी आढळणारे पंच बदलण्याची गरज आहे.
मटका व्यावसायिक व पोलीस यांची आर्थिक देवघेव कशाप्रकारची आहे, याची आकडेवारी पाटील यांनी सांगितली. कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये ६० मटकाबुकी मालक आहेत. तर कोल्हापूर शहरामध्ये १० मटकाबुकी मालक आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ात दररोज १ कोटी रुपयांचा मटका व्यवसाय चालतो. मटका व्यावसायिकांना अभय मिळावे यासाठी ते पोलिसांना दरमहा अडीच कोटी रुपयांचा हप्ता पोहोच करतात. कोणत्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला कोणत्या पोलिसाकरवी हप्ता पोहोच होतो याची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. कोल्हापूरसह इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, गडहिंग्लज, कागल, राशिवडे येथे मटक्याची उलाढाल मोठय़ा प्रमाणात होत असते.    
गेल्या तीन महिन्यांपासून मटकाधंदा बंद केला होता. तर पोलिसांनीच आपल्यासाठी पुन्हा सुरू करायला लावला. हप्ते न दिल्यामुळेच गेल्या आठवडय़ात माझ्यावर कारवाई करण्यात आली. अटक केली तेव्हा कोणाला किती हप्ते देतो याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यामुळे चिडून जाऊन पोलिसांनी यापुढे माध्यमांशी बोलल्यास मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

 
 
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 10:00 am

Web Title: gambler says using installments to policemen we run our profession safely
Next Stories
1 वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना पैशापेक्षा मानव हित महत्त्वाचे – पाटील
2 इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा मोर्चा
3 सुशीलकुमारांच्या सोलापुरात सफाई कामगारांची स्थिती दयनीय
Just Now!
X