23 September 2020

News Flash

व्यसनातून तयार झाली दरोडेखोरांची टोळी

साऱ्यांना गांजा ओढण्याचे व्यसन होते यातूनच त्यांची ओळख आणि पुढे सराईत गुन्हेगारांची टोळी तयार झाली, अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.

| February 14, 2014 02:10 am

पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथून कराडच्या कोल्हापूर नाक्यापर्यंत पाठलाग करून शहर पोलिसांनी दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या नऊ जणांच्या टोळीला गावठी कट्टा, चाकू, लोखंडी गज अशा शस्त्रांसह जेरबंद केले. या टोळीतील स्थानिक चारजण देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी येथे गेले असता, तेथेच तामिळनाडूतील तीन ठगांची गाठ पडली. या साऱ्यांना गांजा ओढण्याचे व्यसन होते यातूनच त्यांची ओळख आणि पुढे सराईत गुन्हेगारांची  टोळी तयार झाली, अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. त्यातील एक आरोपी यापूर्वीच चोरीच्या गुन्ह्यात उघड झाला असून, हा बहाद्दर सराईत म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.
म्हासोली (ता. कराड) येथील सलीम मुल्ला याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे कराड तालुका व शहर पोलिसात दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील धूम स्टाईल चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. शहर पोलिसांनी गजाआड केलेल्या दरोडय़ाच्या टोळीत सलीम ताजुउद्दीन मुल्ला (वय १९, रा. म्हासोली, ता. कराड), शमशुद्दीन रसीद सय्यद (वय ४८, रा. कल्पतरू कॉलनी, कार्वे रोड, कराड), माणिक श्रीनिवास कसबे (वय ४५, रा. शेरे, ता. कराड), कुमार प्रकाश जाधव (वय २१, रा. दुशेरे, ता. कराड) या चार संशयीतांसह तिरुवनल्ली (तामिळनाडू) येथील गणेशमनी कोंडरम (वय २७), विघ्नेश पुंगवरण (वय २१), कार्तिकेयन नटराजन मुदलीयार (वय ३८) या तिघांचा समावेश आहे. यामधील माणिक कसबे हा त्याच्या काही साथीदारांसह काही दिवसांपूर्वी तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेला होता. कसबे याच्या काही मित्रांना गांजा ओढण्याचे व्यसन आहे. त्यातून त्यांची तिरुपती येथे गणेशमनी कोंडरम, विघ्नेश पुंगवरण व कार्तिकेयन मुदलीयार या तिघांशी ओळख झाली होती. या व्यसनातून एकत्र आलेल्या संशयीतांची एकमेकांशी ओळख होताना कसबे व त्याच्या मित्रांनी आपण मुंबईचे भाई असल्याचे तर तामिळनाडूमधील तिघांनी आपणही अवैध व्यवसायात माहिर असल्याच्या एकमेकांना भूलथापा मारल्या. मूळचे गांजा  सेवनाचे व्यसन त्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमीमुळे तामिळनाडूतील तीनजणांसह महाराष्ट्रातील चार जण अशी एक टोळी निर्माण झाली. मात्र, ही टोळी दरोडय़ाच्या तयारीत असतानाच चतुर्भूज झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 2:10 am

Web Title: gang addict bandit crime arrested
टॅग Arrested
Next Stories
1 काष्टी ते केडगाव चौफुला सर्वेक्षण नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी आशेचा किरण
2 पारनेरला लिलाव नाहीच शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या दारात
3 संत तुकाराम वनग्राम योजना गुंडेगाव समितीला पहिले पारितोषिक
Just Now!
X