मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध विक्रम होत असताना ‘गरुड’ चित्रपटाचे चित्रीकरण आठ दिवसांत करून विक्रम करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
या अगोदर मराठीत सलग नऊ दिवस चित्रीकरण करून विक्रम केला गेला आहे. तो विक्रम या निमित्ताने मोडला जाणार आहे. ‘गरुड’ चित्रपटाचा येथे मुहूर्त झाला. त्यासाठी सलग आठ दिवस चित्रीकरण करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहर, पन्हाळा, गगनबावडा आणि पन्हाळा येथे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाची प्रत्येक शॉट आणि संबंधित तयारी पूर्ण झाली आहे. मोहन जोशी, विजय चव्हाण, उषा नाईक, अरुण कदम, स्वप्नील राजशेखर, मिलिंद ओक, श्री रावराणे, दुष्यंत इनामदार, नायिका ज्योती जोशी आणि पांडुरंग गजगेश्वर असे प्रमुख कलाकार आहेत.
डीपीटी फिल्म्सची निर्मिती असणारा हा चित्रपट रहस्यमय आहे. चित्रपटाची कथा पांडुरंग गजगेश्वर यांची आहे. संगीत मेघराज सुतार, रोहित रोहन यांचे आहे. ताहीर कुरणे दिग्दर्शित या चित्रपटाचा नृत्यदिग्दर्शक दुष्यंत इनामदार आहे. व्यवस्थापक रजनीकांत चोले आहेत, तर कॅमेरामन मिलिंद कोठावळे आहेत.