त्यासाठी जनुकशास्त्रज्ञांना डॉक्टरांशी हातमिळवणी करून पुढची पावले टाकावी लागतील. भरवशाचे आणि आवाक्यातील तंत्रज्ञान वापरात येण्यासाठी काही काळ जाणारच. पण नव्या प्रयोगांमुळे जनुकशास्त्राने कात टाकली आहे असेच म्हणावे लागेल.
आपल्या आरोग्याची तपासणी नियमित काळानंतर म्हणजे साधारणत: वर्षांतून एकदा तरी रक्ततील विविध घटकांची पातळी मोजून घेण्याचा सल्ला आपले फॅमिली डॉक्टर देतात. त्याचा उद्देश कुठल्याही घटकाच्या पातळीतील घडलेला बदल लक्षात घेऊन त्यानुसार औषधोपचार करण्यासाठी आणि आहार निवडण्यासीठी असतो. चाचणीत सर्वच घटक स्थिर पातळीत असतील तर ते आपल्या आरोग्याची स्थिरता दर्शवते.
रक्तातील घटकांची पातळी ही शरीरातील विविध चयापचयाच्या क्रियांवर अवलंबून असते आणि या क्रिया मूलत: पेशीतील डीएनए नियंत्रित करतो. त्यामुळे शरीरातील क्रियांचा पहिला धांडोळा डीएनएपासूनच सुरू करायला काय हरकत आहे ही कल्पना जनुकशास्त्रज्ञांच्या मनात सारखी घोळत होती. पण डीएनएतील बदल पहाणे तितके सोपे आणि परवडणारे नव्हते.
विसाव्या शतकाच्या शेवटी मानवी जेनोम प्रकल्प मोठय़ा शर्थीने पुरा करण्यात आला पण त्यात लाखो डॉलर्स खर्ची पडले. प्रकल्पानंतर जनुकानुसार उपचार किंवा जनुकांवर उपचार करून आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हातात येईल अशी भाकिते करण्यात आली होती. पण काही निवडक जनुके सोडून इतर जनुके व्याधी निर्माण करताना एकत्रित काम करतात आणि व्याधींचे अनुमान केवळ शक्यतेने करता येत असल्याने अशा निष्कर्षांना वैद्यकीय क्षेत्रांत मान्यता मिळणे कठीण होते. पण जनुकशास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि आशावाद दांडगा होता. त्याचा परिणाम म्हणून डीएनए क्रम शोधण्याची तंत्रे विकसित होऊन त्याचा खर्च कमी होण्यात झाला. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर २००७ मध्ये हा क्रम पहायला दहा लाख डॉलर्स लागत होते. तर तोच खर्च सध्या ४००० ते १०,००० डॉलर्स इतका खाली आला आहे. त्यामुळे डीएनएचा क्रम शोधणे आपल्याला इतर वैद्यकीय चाचण्यांना (कॅट किंवा एमआरआय स्कॅनसारख्या) जेवढा खर्च होतो तेवढय़ा खर्चात होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. दुसरे म्हणजे नुसते जनुक शोधून फारसा फायदा नसतो तर त्याच्या सक्रियते किंवा निष्क्रियतेबद्दल जे जे टप्पे असतील उदा. आरएनएचे विविध प्रकार व पातळ्या (ट्रान्सक्रीप्टोम), होणाऱ्या प्रथिनांचे प्रकार व पातळ्या (मेटॅबोलोम) याची पुरती जाणीव पुढच्या संशोधनात आली आहे.
जनुकांच्या सर्वागीण चाचणीआधी जास्तीत जास्त व्यक्तींचा डीएनए क्रम पहाण्याची लाट आली होती. त्यातले दोन महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे १००० व्यक्तीची डीएनए क्रमाची चाचणी (1000 Genome project)आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निरनिराळ्या देशातील व्यक्तींच्या डीएनए क्रमांच्या चाचण्या (International Hap Map Project).  व्यक्तीव्यक्तीमधल्या डीएनएत ९९ टक्के साम्य असते. पण उरलेल्या एक टक्क्य़ात भिन्नता दडलेली असते. या मिन्नतेमुळे व्यक्तीच्या डीएनए क्रमात वेगळेपणा रहातो. डीएनएतील न्यूक्लेरक अ‍ॅसिड आम्लाच्या ‘बेस’मधेही आढळतो. त्यामुळे व्याधी होत नसतील पण ती व्यक्तीला वैशिष्टय़ मिळवून देते.
डीएनए क्रमाचा व्याधीशी संबंध जोडणारे दोन महत्त्वाचे प्रयोग काही काळापूर्वी झाले. त्या दोनही प्रयोगांचे केंद्र होते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील जनुकशास्त्र विभाग. एक प्रयोग या विभागाचे मुख्य डॉक्टर मायकेल स्नायडर यांच्यावर करण्यात आला तर दुसरा वेस्ट नावाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे डीएनए क्रम पूर्ण करून पार पडला.
जनुकांची रचना तसेच त्यामुळे होणाऱ्या शरीरातील क्रिया भोवतालच्या परिस्थितीनुसार सतत बदल असतात. त्यादृष्टीने ती गतिमान असतात. या क्रिया चालू असताना त्याचे इतर जनुकांशी असणारे संबंध हेही महत्त्वाचे असतात. आपल्या नेहमीच्या जीवनात आपण उउळश्  च्या महत्त्वाबद्दल वाचतो. त्यामुळे अनोळखी चोर पकडायला मदत होते. त्यांची हालचाल, चेहरामोहरा हाताशी मिळाल्याने हे शक्य होते. शरीरात जनुके काय ‘उचापती’ करतात हे त्यांचा क्रम व त्यांची सक्रियता विशिष्ट काळाने मोजत गेल्यास सहज लक्षात येते आणि योग्य ते निष्कर्ष काढता येतात. डॉक्टर स्नायडर यांच्याबाबत असेच घडले. स्नायडर यांच्या जनुकांची आणि संबंधित क्रियांची पुरी छाननी करण्यात आली. शास्त्रीय भाषेत त्याला नाव दिले गेले integrative Personal Oniks Profile! हा प्रयोग दोन वर्षे चालला. या दोन वर्षांत त्यांना दोनदा विषाणू बाधा झाली. त्यामुळेही त्यांच्या डीएनएवर काय परिणाम झाला हे पाहिले गेले. जनुकांची सर्वसाधारण चाचणी स्नायडर यांनी आधी केली होती. त्यात मधुमेहाची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता लक्षात घेऊन स्नायडर यांच्या रक्तातील साखरेची पातळीही नियमित मोजली जात होती. सर्व चाचण्या चालू असताना विषाणू संसर्गाच्या बरोबर दहा दिवसांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती वाढतच राहिली. याबाबत स्नायडर यांनी वैद्यकीय सल्ला घेतला तेव्हा मधुमेह झाल्याचे निदान झाले! एरवी साखरेची पातळी वाढत असल्याने त्यांच्या लक्षातही आले नसते आणि शरीरात इतर लक्षणे दिसल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले असते.
विषाणू संसर्ग झाला त्यावेळेस २००० जनुके जास्त सक्रिय झाली तर २२०० जनुकांचे काम थंडावले. त्यामुळे जनुकांचा विषाणू संसर्गाशी काय संबंध आहे ते पण स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर विषाणू संसर्गामुळे मधुमेहाच्या कुठल्या क्रिया प्रभावित होतात तेही समजले. स्नायडर यांच्या मते या चाचणीत जरी सर्व ४०,००० जनुकाचा समावेश केला गेला असला तरी पुढच्या काही प्रयोगात एवढी जनुके पहाण्याची गरज पडणार नाही.
जनुकचाचणीतून काय मोठे विशेष झाले अशी विचारणा झाल्यास उत्तरादाखल सांगता येईल की प्रथम म्हणजे मधुमेहाच्या शक्यतेची प्रथम धोक्याची सूचना कळली आणि रक्तात साखरेची पातळी वाढत असतानाची वेळही समजली. थोडक्यात सध्या उपलब्ध असलेल्या रक्ताच्या चाचण्याआधी मधुमेहाची कल्पना आधी आली. व्याधीची सुरुवात जितकी लवकर कळेल तितकी त्यावर केलेली औषधयोजनाही प्रभावी ठरेल. दुसरे म्हणजे औषधही दीर्घकाळ घ्यावे लागणार नाही. स्नायडर यांचा हा जनुकचाचणीचा प्रयोग सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. पण आहे त्या चाचण्यांतून निवड करत त्यांची संख्या कमी करून आणि तंत्रात सुधारणा करून आरोग्यचाचण्या मध्यमवर्गाच्या तरी आवाक्यात येतील अशी आशा आहे. वरच्या चाचण्यांना स्नायडरच का तयार झाले तर त्याची उत्तरे दोन होती. एकतर हा त्यांचाच प्रयोग असल्याने वारंवार नमुने देणे त्यांना शक्य होते आणि दुसरे म्हणजे चाचणींतून त्यांच्या आरोग्याबाबत काही गंभीर निष्कर्ष निघाले तर ते स्वीकारायला ते पूर्णपणे तयार होते!
जनुकचाचणीच्या दुसऱ्या प्रयोगात एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींचे डीएनए क्रम व जनुकचाचणी घेण्यात आली. वेस्ट नावाच्या कुटुंबातील पती-पत्नी (जॉन व ज्युडी) आणि त्यांची मुले (पॉल व अ‍ॅन) हे सर्व त्यात समाविष्ट होते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे डीएनए क्रम पहाण्याने अनुवंशिकरीत्या कुठली जनुके कुठल्या अपत्याकडे जातात ते कळते. त्याप्रमाणे काळजीही घेता येते. दुसरे म्हणजे डीएनएक्रम किंवा जनुकांची निश्चिती करण्यात चुका कमी होतात कारण तुलना विशिष्ट ठिकाणीच करायची असते. वेस्ट अशा चाचणीबद्दल जास्त उत्सुक होते. त्यांची चाचणी झाल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील काही डॉक्टरांची मदत घेऊन त्यांनी Personalis  नावाची कंपनीच काढली. तिचा उद्देश्य कुटुंबांना डीएनएक्रम निश्चित करण्यासाठी प्रोत्साहीत करून त्यांच्यातील व्याधींचा (बव्हंशी सुप्त असलेल्या) छडा लावण्याचा होता. वेस्ट कुटुंबाला याचा फायदा नक्कीच झाला. खुद्द वेस्ट यांची जनुकचाचणी २००३ साली झाली होती तर पूर्ण कुटुंबाची चाचणी २००९ साली झाली. त्यात त्यांना रक्तात गुठळी होण्याची व्याधी (फॅक्टर व्ही लेडेन) विशिष्ट जनुकाच्या चुकीच्या क्रमामुळे (म्युटेशन) होत असल्याचे दिसले. सर्व कुटुंबाच्या चाचणीत त्यांनी ही व्याधी मुलीकडे संक्रमित केल्याचे आढळले. या व्याधीबद्दल काळजी घेण्यासाठी विशिष्ट अन्नघटक टाळावे लागतात आणि सहसा रक्ताच्या गुठळ्या पायात होत असल्याचे दीर्घ काळ एके जागी बसणे टाळावे लागते. त्यांच्या मुलीच्या बाबतीत तिने संतती विरोधक गोळ्या नियमित घेणे धोक्याचे होते. ते तिने टाळले. वेस्ट यांना रक्त पातळ ठेवण्यासाठी वारफॅरिन नावाचे औषध घ्यावे लागते. त्याचा डोसही वर केलेल्या चाचणीमुळे नियंत्रित करता आला.
डीएनए क्रम निश्चित केल्याचा फायदा काही औषधे कशा प्रमाणात घ्यावी यासाठीही होतो. त्यामुळे ज्यांना दीर्घकाळ एकच औषध घ्यायचे आहे त्याचा प्रभावीपणा त्या औषधाला निष्क्रिय करणाऱ्या जनुकांच्या माहितीमुळे वाढतो.
स्टॅनफर्ड विद्यापीठातील जैव अभियांत्रिकी संशोधक मोनिका ओरटिझ व ड्रय़ू एंडी यांनी या परोपजीवी एम-१३ विषाणूतील महत्त्वाच्या गुणधर्माचा वापर बाय-फाय म्हणजे जैविक इंटरनेटसाठी केला आहे.

नासाने वाढत्या खर्चामुळे अवकाश संशोधनाच्या खासगीकरणास प्राधान्य दिल्यानंतर  व्हर्जिन गॅलक्टिक, स्ट्रॅटोलाँच या कंपन्यांची  व्यावसायिक अंतराळप्रवासाची स्वप्ने येत्या पाच-सहा वर्षांत पूर्ण होतील. त्यानंतर दहा वर्षांत मंगळावर पोहोचण्याची तमन्ना या मंडळींनी बाळगली आहे. काही दिवसांनी नवविवाहित जोडपी हनीमूनला अंतराळात जातील तो दिवस आता दूर नाही.