समुद्राच्या तळातील अद्भुत निसर्गसौंदर्याचे व तेथील सुंदर जीवसृष्टीचे तसेच मोहात पाडणारे विविध प्रकारचे दुर्मिळ मासे विविध प्रकारच्या अ‍ॅक्वेरियमच्या (फिश टँकच्या) रूपाने ‘अ‍ॅक्वा लाईफ २०१३’ या प्रदर्शनातून पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे. लौकिक क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘अ‍ॅक्वा लाईफ २०१३’ हे प्रदर्शन १९ ऑगस्टपर्यंत करवीर भगिनी मंडळ हॉल येथे भरविण्यात आले आहे.     
या प्रदर्शनामध्ये १००पेक्षा जास्त फिश टँकचा समावेश असून त्यामध्ये २५०हून जास्त माशांच्या प्रजाती आणि १००हून अधिक एक्झॉटिक प्लांट्स (समुद्रातील वनस्पती) पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये रेड चिली अरवाना, गोल्डन बॅक अरवाना, आफ्रिकन अरवाना, सिल्व्हर अरवाना, गोल्ड फिश, पर्ल स्केल गोल्ड फिश, बबल आय गोल्ड फिश, रेड कॅप गोल्ड फिश, रेड ऑरेंडा, ब्लॅक घोस्ट फिश, टॅटू फिश, लिपस्टिक फिश अशा असंख्य व विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती लोकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.    
फ्रंटोसा, लेलेयुपी, टेलमाटेक्रोनिस, ब्रेवी मोटोटो, युटिंटा यांसारख्या विविध १२४ समुद्रातील वनस्पती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बल्ब प्लांट्स, अनुबिआस आणि फर्न, बॅकग्राऊंड (स्टेमप्लांट्स) आणि फ्लोटिंग प्लांट्स असे विविध प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत, असे संयोजक लौकिक सोमण यांनी सांगितले.