29 September 2020

News Flash

शुक्रवारी ‘गझल सुफियाना’

गझल गायनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या गायिका पूजा गायतोंडे यांचा ‘गझल सुफियाना’ हा गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, २८ जून रोजी रात्री ८ वाजता वीर सावरकर सभागृह,

| June 27, 2013 03:38 am

गझल गायनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या गायिका पूजा गायतोंडे यांचा ‘गझल सुफियाना’ हा गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, २८ जून रोजी रात्री ८ वाजता वीर सावरकर सभागृह, स्वा. सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
पं. ए सी आर भट यांची शिष्या असलेल्या पूजा गायतोंडे यांनी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, गझल गायनाचे शिक्षण घेतले आहे.
या कार्यक्रमाला अनुप जलोटा, कविता सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मैफलीचे संगीत संयोजन परेश एन शाह यांनी केले असून मेहदी हसन, जगजित सिंग, आशा भोसले, अनुप जलोटा आदींनी गायलेल्या लोकप्रिय गझला पूजा गायतोंडे सादर करणार आहेत. मैफलीचे सूत्रसंचालन प्रज्ञा विकास आणि औबेद आझमी करणार       आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:38 am

Web Title: ghazal sufiyana on friday
टॅग National Award
Next Stories
1 खबर काढण्यासाठी खंडणीखोरांची नवी शक्कल
2 ‘लोकसत्ता’चे सहपालकत्व मोलाचे
3 म्हाडाच्या ३८३८ घरांच्या ताब्याचा प्रश्न मिटला
Just Now!
X