20 September 2020

News Flash

पालिकेच्या मुख्याधिका-यांना घेराव

मोरगेवस्ती भागातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज नागरिकांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना तब्बल दीड तास घेराव घातला. या वेळी विरोधी नगरसेविका व खांडेकर यांच्यात वादावादी

| June 15, 2013 01:35 am

मोरगेवस्ती भागातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज नागरिकांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना तब्बल दीड तास घेराव घातला. या वेळी विरोधी नगरसेविका व खांडेकर यांच्यात वादावादी झाली.
मोरगेवस्ती भागात गटारी साफ़ केल्या जात नाही. स्वच्छतागृहाच्या टाक्या तुंबल्या आहेत. चारीचे रूपांतर गटारीत झाले आहे. गटारीतील किडे हे घरात व परिसरात सर्वत्र आढळून येतात. साफसफाई होत नाही, अशा एक ना अनेक समस्या या भागात आहेत. राज्यात आदर्श नगरपालिका म्हणून टेंभा मिरवला जातो. स्वच्छतेचे पारितोषिक मिळविले जाते. पण वास्तव वेगळे असल्याचे आजच्या आंदोलनामुळे स्पष्ट झाले. मुख्याधिकारी खांडेकर यांना विरोधी नगरसेविका निर्मला मुळे, भारती कांबळे, मंजुश्री मुरकुटे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे तसेच मनीषा मुरकुटे, लकी गोयल, राजेद्र पवार, लकी सेठी आदींसह दीडशे ते दोनशे नागरिकांनी घेराव घातला. तब्बल दीड तास कामकाज बंद पडले होते.
आम्ही कर भरतो, त्यामुळे नागरी सुविधा मिळायलाच हव्यात. या भागातील प्रश्न गंभीर असताना मुख्याधिकारी खांडेकर हे माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना या भागात समस्याच नाही, अशी माहिती देतात. दिशाभूल करतात, ते फक्त काँग्रेस पक्षाचे झाले असून, त्यांनी या पक्षात जाहीर प्रवेश करावा, अशी टीका संतप्त महिलांनी केली. समस्यांची पाहणी करायला येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. शिक्षण मंडळाच्या निवडणुकीमुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाहणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:35 am

Web Title: gherao to chief officer of mnc
Next Stories
1 अभियांत्रिकी शिक्षणात रोज नवीन दालने – शरद पवार
2 कोल्हापूर शहरात आणखी एक खून उघड (शहरातील चार महिन्यातील आठवा खून)
3 डॉक्टर पत्नीची मुलीसह आत्महत्या; डॉक्टर पतीला पोलीस कोठडी
Just Now!
X