News Flash

विजय पांढरेंसह दहा जणांना ‘गिरणा गौरव’ पुरस्कार

गैरव्यवहारांविषयी तोफ डागत जलसंपदा विभागाला हादरवून सोडणारे व धार्मिक वृत्ती अंगीकारणारे ह.भ.प. विजय पांढरे, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत, चित्रपट दिग्दर्शक राजीव

| January 15, 2013 12:26 pm

गैरव्यवहारांविषयी तोफ डागत जलसंपदा विभागाला हादरवून सोडणारे व धार्मिक वृत्ती अंगीकारणारे ह.भ.प. विजय पांढरे, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत, चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांसह दहा जणांना येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘गिरणा गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरात पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष असून सामाजिक, साहित्यिक, सहकार, वैद्यकीय, पर्यावरण, शेती, कला, व्यापार, उद्योग आदी क्षेत्रांत महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात येते. यंदा निवड झालेल्या पुरस्कारार्थीमध्ये ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर), उद्योगपती अशोक कटारिया (नाशिक), माजी आमदार जिवा पांडू गावित (सुरगाणा), महापौर मंजूषा गावित (धुळे), अ‍ॅड. पंडितराव भदाणे (सटाणा), श्रावण म्हसदे (नाशिक), कृषिमित्र खेमराज कोर (सटाणा), शंकर बर्वे (नाशिक), डॉ. दिलीप शिंदे (सटाणा), अनिल पाटील (सटाणा), ज्येष्ठ कवी विलास पगारे (देवळा), नंदकुमार खैरनार (कळवण), केशव रायते (निफाड), किशोर पगार (कळवण) आदींचाही या पुरस्कारात समावेश आहे.
निवड समितीचे अध्यक्ष शिवराज नरवडे, प्रल्हाद देशमुख, रवींद्र पाटील, सुरेखा कुलकर्णी, रत्नाकर मुंदडा यांनी पुरस्कारार्थीची निवड केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:26 pm

Web Title: girana gaurav award to ten people along with vijay pandhre
Next Stories
1 वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘आरोग्यरथ’ उपक्रम
2 सम्यक निवास हक्क परिषदेची मागणी
3 स्पर्धा परीक्षांसाठी गावोगावी ज्ञानमंदिरांची गरज
Just Now!
X