वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देऊन त्यास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय वीरशैव महासभेच्यावतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती, वीरशैव महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी दिली.
वीरशैव िलगायत धर्मात ७५ जाती व ३०० पोटजाती आहेत. यापकी बहुसंख्य जाती – पोटजाती ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये मोडतात. या समाजाची देशातील लोकसंख्या सुमारे ४ कोटी असून हा समाज प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यामध्ये विखुरला आहे. घटनेच्या २५ व्या कलमाप्रमाणे ‘िलगायत’ समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देवून अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, अशी वीरशैव महासभेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
या प्रश्नावर वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शामनूर शिवशंकरप्पा यांच्यासह विश्वनाथ चाकोते (महाराष्ट्र), भीमण्णा खंड्रे, अरिवद जत्ती, ईश्वर खंड्रे (कर्नाटक), महासभेच्या महिला आघाडी प्रमुख सरला पाटील, मधुरा अशोककुमार आदीच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सोनिया गांधी यांनी या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्याकडे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचे विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले.