मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न मिळाल्यास आगामी निवडणुकीत मराठा समाज सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला.
वडवणी येथील रेणुका संस्थानच्या सभागृहात मेटे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय मराठा कार्यकर्त्यांची बठक झाली. माजी आमदार जनार्दन तुपे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, दत्तात्रय वाळसकर, पापा सोळंके आदी उपस्थित होते. मेटे म्हणाले, की आपला या सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला विरोध आहे, त्यावर बसलेल्या माणसांना नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खुच्र्या आडव्या येत असतील तर येत्या निवडणुकीत या खुच्र्या खाली खेचा. त्या आरक्षण मिळवू देत नाहीत. आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी आरक्षणामध्येच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला.