News Flash

गुंगीचे औषध देऊन रेल्वेत तरुणीला लुटले

आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी बंगळुरू येथून नागपूरकडे निघालेल्या एका तरुणीला रेल्वे प्रवासात गुंगीचे औषध देऊन १५ हजारांसह तिची बॅग पळविणाऱ्या एका दाम्पत्याचा शोध रेल्वे पोलीस

| January 22, 2013 09:55 am

आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी बंगळुरू येथून नागपूरकडे निघालेल्या एका तरुणीला रेल्वे प्रवासात गुंगीचे औषध देऊन १५ हजारांसह तिची बॅग पळविणाऱ्या एका दाम्पत्याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. गुलबर्गा-वाडी दरम्यान हा प्रकार घडला.
शबाना सरदार खान (वय २०) ही तरुणी मूळ नागपूरची असून ती सध्या बंगळुरू येथे खासगी नोकरी करते. नागपूर येथे आपली आई आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी व तिला औषधोपचाराचा खर्च देण्यासाठी शबाना ही कोईमतूर-कुर्ला व्हाया बंगळुरू एक्स्प्रेसने निघाली होती. तिच्या शेजारी एक जोडपे होते. प्रवासात ओळख वाढवत या दाम्पत्याने शबाना हिला खाण्यासाठी दहिभात दिला. दहिभात खाल्ल्यानंतर शबाना हिची शुध्दी हरपली. सोलापूरच्या अलीकडे ती शुध्दीवर आली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिच्या जवळील १५ हजारांची रोकड व बॅग गायब झाली होती. प्रवासात दहिभात दिलेले जोडपेही गाडीत नव्हते. सोलापूर रेल्वे स्थानकात तिने आपली व्यथा मांडली. तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांना गहिवरून आले. सर्वानी मदतीचा आधार दिला व तिला खासगी बसने नागपूरला पाठविले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 9:55 am

Web Title: giving intoxication liquid in train leads to robbery of 15 thousand rs erer looted
Next Stories
1 यंत्रमाग कामगारांच्या बंदमुळे वस्त्रनगरीतील उलाढाल ठप्प
2 पोलीस ठाणे ऑनलाइन पद्धती प्रशिक्षण कार्यशाळा
3 दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषद ठोस पावले आखत नसल्याची टीका
Just Now!
X