News Flash

बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह

मांगल्याचा आणि आनंदाला उधाण देणाऱ्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण विदर्भासह बुलढाण्याची बाजारपेठ सजली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फाही विक्रेत्यांनी या सणाला साजेशा साहित्याची दुकाने थाटली आहेत.

| November 13, 2012 03:58 am

मांगल्याचा आणि आनंदाला उधाण देणाऱ्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण विदर्भासह बुलढाण्याची बाजारपेठ सजली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फाही विक्रेत्यांनी या सणाला साजेशा साहित्याची दुकाने थाटली आहेत.  
उद्या लक्ष्मीपूजनासाठी घरी पोहोचण्यासाठी बाहेरगावी नोकरी करणारे नोकरदार व विद्यार्थी गावाकडे मोठय़ा संख्येने परतत आहेत. ही संख्या लक्षात घेऊन एस.टी. महामंडळानेही मराठवाडा, खान्देश, पुणे नागपूरसाठी अतिरिक्त बसगाडय़ांची व्यवस्था करून प्रवाशांची गरसोय दूर केली आहे. बाजारात २५ ते ४० रुपये किलो प्रमाणे फरसाण तयार करून मिळत आहेत.
शहरात पन्नास फटाक्यांची दुकाने बाजारात थाटली असून ग्रामीण भागातील लोकही मोठय़ा प्रमाणात फटाके खरेदी करताना दिसत आहेत. पगारवाढ, दिवाळी बोनस, फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्समुळे नोकरदारही फटाक्यांची धूमधडाक्यात खरेदी करीत आहेत. फटाक्यांची दरवर्षी ५० लाखांपर्यंत उलाढाल होते. फटाक्याचे गिप्ट हॅंपरही पाचशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत, मात्र फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 3:58 am

Web Title: gladness in market in festival of diwali
Next Stories
1 फटाक्यांमुळे भारतात दरवर्षी पाच हजार लोकांना अंधत्व
2 पुनर्मूल्यांकनात चुका झाल्याच्या विद्यापीठाकडे सहा हजार तक्रारी
3 यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून माणिकराव इच्छुक
Just Now!
X