ठाणे शहरातील १२० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाची त्रवार्षिक निवडणूक रविवार, २८ सप्टेंबर रोजी पार पडली. या वेळी संस्थेच्या अध्यक्षपदी पुढील तीन वर्षांसाठी मा. य. गोखले यांची निवड करण्यात आली. तर विद्याधर ठाणेकर, पद्माकर शिरवाडकर, चांगदेव काळे व सतीशचंद्र कोर्डे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तर संजीव ब्रह्मो, हेमंत काणे, शीला मराठे, अरुण म्हात्रे आणि मोहन पवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
मराठी ग्रंथ संग्रहालयाची संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सीमा विकास दामले, जयंत केशव दातार, संजय जगन्नाथ चुंबळे, आशा सुरेश जोशी, अनिल शंकर ठाणेकर, अरुण गंगाधर करमरकर, वसंत विठ्ठल धावडे, कृष्णकुमार शंकर कोळी, महादेव ओंकार गायकवाड, विद्याधर आत्माराम वालावलकर आणि राजेंद्र दामोदर वैती यांची निवड करण्यात आली.
नव्या कार्यकारिणीच्या वतीने ठाणे ग्रंथसंग्रहालय अधिक कार्यक्षम आणि आदर्श वाचनालय बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
निवडणुकीचे निवडणूक अधिकारी प्रमोद मथुरे यांनी काम पाहिले, तर वाचनालय कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.