दिल्लीमध्ये झालेल्या पंधराव्या राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये नगरच्या दिया दीपक अग्रवाल हिने सुवर्णपदक पटकावले. तिला आंतरराष्ट्रीय प्रथमश्रेणीचे मानांकन देण्यात आले. दिया तक्षशीला स्कूलमध्ये दुसरीत शिकते.
ऑलिम्पियाड फौंडेशनच्या वतीने भारताहस ११ देशांत ही स्पर्धा आयोजित केली होती. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये यासाठी प्राथमिक चाचणी झाली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दुस-या चाचणीत तिला विज्ञान शाखेसाठी मानांकन मिळाले. दिल्लीत झालेल्या पारितोषिक वितरणात फौंडेशनचे कार्यकारी संचालक महावीर सिंग यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या वेळी देशाचे माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी, इस्रोचे प्रा. राजन, ब्रिटिश कौन्सिलचे चार्ली वॉकर आदी उपस्थित होते. दिया ही येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आंचल अग्रवाल यांची कन्या आहे.