नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय ग्रीन बिल्डिंग संकल्पनेनुसार उभारण्यात आले आहे. या वास्तूचे उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या मुख्यालयाच्या वास्तूस इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या वतीने लीड इंडिया एनसी गोल्ड हे मानांकन प्राप्त झाले आहे.
लीड इंडिया संस्थेचे अध्यक्ष व्ही. सुरेश यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक नुकतेच प्रदान केले. अशा प्रकारे ग्रीन बिल्डिंगचे गोल्ड मानांकन प्राप्त करणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका व पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या मानांकनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची पामबीच मार्गावरील किल्ले गावठाण या ऐतिहासिक स्थळासमोर उभारलेले नूतन मुख्यालय इमारत नवी मुंबईचा लँडमार्क म्हणून ओळखली जाते. अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून साकारलेल्या या इमारतीत पाणी, विजेची बचत करणाऱ्या तसेच इमारत परिसरातील उद्यानात स्प्रिंकलर यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय ही इमारत पर्यावरणपूरक आहे. अशा वास्तूंच्या उभारणीतून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने युनायटेड स्टेट ग्रीन बिल्डिंग कौन्सिल यांच्या वतीने इंडियन ग्रीन बिल्डिंग आहे. सर्व कौन्सिल यांच्यामार्फत दी लीडरशिप इन एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट डिझाइन इंडिया या संस्थेचा भारतातील पर्यावरणशील इमारतीचे मानांकन करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. सर्व निकषांच्या कसोटीला समोरे जात नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत गोल्ड मानांकनासाठी पात्र ठरली आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला ग्रीन बिल्डिंग गोल्ड नामांकन प्राप्त होणे हा प्रत्येक नागरिकांचा गौरव आहे असे म्हणाले.