News Flash

गुंडांची आता ‘अ‍ॅप्स’वर मदार

ब्लॅकबेरी फोन भारतात आला आणि त्यावरील बीबीएम संदेश मिळत नसल्यामुळे पोलीस हैराण झाले होते.

| July 24, 2013 07:43 am

ब्लॅकबेरी फोन भारतात आला आणि त्यावरील बीबीएम संदेश मिळत नसल्यामुळे पोलीस हैराण झाले होते. अखेरीस ब्लॅकबेरीने भारतातील आपला सव्‍‌र्हर तपास यंत्रणांना उपलब्ध करून दिला. यातून बाहेर पडलेल्या तपास यंत्रणांपुढे आता व्हॉट अ‍ॅप्स, चॅट ऑन, वायबर आदी नव्या पिढीतील लोकप्रिय संदेशवहन यंत्रणांचे आव्हान निर्माण झाले आहे. गुंडांकडून सर्रास या अ‍ॅप्सचा वापर केला जात असल्यामुळे पोलिसांना या गुंडांचे मोबाईल क्रमांक मिळूनही प्रत्यक्षात काहीही हाती लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी या माहितीस दुजोरा दिला. मोबाईलवर पाठविण्यात आलेले लघुसंदेश नेमके काय होते, हेही समजू शकत होते. त्यासाठी काही काळ लागत असे. परंतु एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर लघुसंदेश पाठविण्यात आल्याचे स्पष्ट होत होते. न्यायालयातही पुरावा म्हणून सादर करता येत होते. परंतु या नव्या चॅट पद्धतीने संदेश मिळविणे मुश्किल बनले आहे. त्यामुळेच काही गुंडही आता ही पद्धत वापरीत आहेत. अगदी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडूनही एखाद्याची सुपारी देण्यासाठी या अत्याधुनिक चॅटिंगचा वापर
केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या यंत्रणेद्वारे कितीही मोठी फाईल पाठविता येते तसेच छायाचित्रेही सहजगत्या पाठविता येत असल्यामुळे गुंडांचे फावले आहे. गुंडांचा कॉल रेकार्ड (सीडीआर) मिळविता येतो. परंतु ‘अ‍ॅप्स’वरील चॅटिंग उपलब्ध
होत नसल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपींनी या बाबतचे अधिकाधिक संदेश ‘व्हॉट अ‍ॅप्स’द्वारे पाठविले होते. हे संदेश मिळविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. हे संदेश ‘डिलिट’ केल्यानंतर ते उपलब्धच होत नसल्याचे आढळून आले आहे. सायबर गुन्हे विभागातील तज्ज्ञांनाही खूपच कसरत करावी लागली होती. अ‍ॅप्सवरील संदेश मिळविणे खूपच कठीण असून संबधित कंपन्या वेगवेगळ्या आहेत. इंटरनेटचा वापर त्यासाठी केला जात आहे. ही माहिती उपलब्ध होऊ शकत असली तरी त्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरची आवश्यकता असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

‘व्हॉट अ‍ॅप्स’ वा ‘चॅट ऑन’, ‘वुई चॅट’, ‘वायबर’ आदी चॅटिंग इंटरनेटचा वापर करून केले जात आहे. त्यामुळे त्यावर नियंणत्र ठेवणे सहज शक्य आहे. संबंधित मोबाईल कंपन्यांशी त्याबाबत बोलणी करता येऊ शकतील. या नव्या चॅटिंग पद्धतीचा गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ते केले पाहिजे. जेव्हा चॅट पुसले जाते तेव्हा ते मोबाईल फोनवरील मेमरीच्या एका कोपऱ्यात कोरले जाते. ते पुन्हा मिळविता येऊ शकते. मात्र त्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे सॉफ्टवेअर आवश्यक आहे – विजय मुखी, सायबर तज्ज्ञ.goons depends on apps
goons depends, depends on apps,
गुंडांची आता ‘अ‍ॅप्स’वर मदार
प्रतिनिधी, मुंबई
ब्लॅकबेरी फोन भारतात आला आणि त्यावरील बीबीएम संदेश मिळत नसल्यामुळे पोलीस हैराण झाले होते. अखेरीस ब्लॅकबेरीने भारतातील आपला सव्‍‌र्हर तपास यंत्रणांना उपलब्ध करून दिला. यातून बाहेर पडलेल्या तपास यंत्रणांपुढे आता व्हॉट अ‍ॅप्स, चॅट ऑन, वायबर आदी नव्या पिढीतील लोकप्रिय संदेशवहन यंत्रणांचे आव्हान निर्माण झाले आहे. गुंडांकडून सर्रास या अ‍ॅप्सचा वापर केला जात असल्यामुळे पोलिसांना या गुंडांचे मोबाईल क्रमांक मिळूनही प्रत्यक्षात काहीही हाती लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी या माहितीस दुजोरा दिला. मोबाईलवर पाठविण्यात आलेले लघुसंदेश नेमके काय होते, हेही समजू शकत होते. त्यासाठी काही काळ लागत असे. परंतु एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर लघुसंदेश पाठविण्यात आल्याचे स्पष्ट होत होते. न्यायालयातही पुरावा म्हणून सादर करता येत होते. परंतु या नव्या चॅट पद्धतीने संदेश मिळविणे मुश्किल बनले आहे. त्यामुळेच काही गुंडही आता ही पद्धत वापरीत आहेत. अगदी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडूनही एखाद्याची सुपारी देण्यासाठी या अत्याधुनिक चॅटिंगचा वापर
केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या यंत्रणेद्वारे कितीही मोठी फाईल पाठविता येते तसेच छायाचित्रेही सहजगत्या पाठविता येत असल्यामुळे गुंडांचे फावले आहे. गुंडांचा कॉल रेकार्ड (सीडीआर) मिळविता येतो. परंतु ‘अ‍ॅप्स’वरील चॅटिंग उपलब्ध
होत नसल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपींनी या बाबतचे अधिकाधिक संदेश ‘व्हॉट अ‍ॅप्स’द्वारे पाठविले होते. हे संदेश मिळविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. हे संदेश ‘डिलिट’ केल्यानंतर ते उपलब्धच होत नसल्याचे आढळून आले आहे. सायबर गुन्हे विभागातील तज्ज्ञांनाही खूपच कसरत करावी लागली होती. अ‍ॅप्सवरील संदेश मिळविणे खूपच कठीण असून संबधित कंपन्या वेगवेगळ्या आहेत. इंटरनेटचा वापर त्यासाठी केला जात आहे. ही माहिती उपलब्ध होऊ शकत असली तरी त्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरची आवश्यकता असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

‘व्हॉट अ‍ॅप्स’ वा ‘चॅट ऑन’, ‘वुई चॅट’, ‘वायबर’ आदी चॅटिंग इंटरनेटचा वापर करून केले जात आहे. त्यामुळे त्यावर नियंणत्र ठेवणे सहज शक्य आहे. संबंधित मोबाईल कंपन्यांशी त्याबाबत बोलणी करता येऊ शकतील. या नव्या चॅटिंग पद्धतीचा गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ते केले पाहिजे. जेव्हा चॅट पुसले जाते तेव्हा ते मोबाईल फोनवरील मेमरीच्या एका कोपऱ्यात कोरले जाते. ते पुन्हा मिळविता येऊ शकते. मात्र त्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे सॉफ्टवेअर आवश्यक आहे – विजय मुखी, सायबर तज्ज्ञ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 7:43 am

Web Title: goons adapts apps
Next Stories
1 आधी वाहतूक कोंडीचा त्रास..आता सात मिनिटांत प्रवास
2 हॉटेलच्या बिलावर काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादी!
3 ऑनलाइन मराठी व्हिडिओ मासिक ‘बुकबाजार’!
Just Now!
X