News Flash

जालन्यात टँकर फेऱ्यांसाठी ‘जीपीएस’ यंत्रणा वापरणार

जिल्ह्य़ात सरकारच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे नेमके ठिकाण व त्यांनी किती फेऱ्या केल्या, या बाबतची अचूक माहिती मिळावी, या साठी जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) यंत्रणेचा

| March 17, 2013 12:05 pm

जिल्ह्य़ात सरकारच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे नेमके ठिकाण व त्यांनी किती फेऱ्या केल्या, या बाबतची अचूक माहिती मिळावी, या साठी जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.
टँकरवर ही यंत्रणा बसविल्यामुळे मुख्यालयाच्या ठिकाणीच टँकर कोठे आणि किती वेळा जातो, हे उपग्रहाच्या माध्यमातून समजू शकेल. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या योजनेसाठी १० लाख ६२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. ग्रामीण भागात विंधन विहिरी दुरुस्तीसंदर्भात जि. प. सदस्य, तसेच अन्य लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांच्या सूचना वाढत आहेत. या साठी वाहन खरेदीकरिता जिल्हा परिषदेस ४ लाख ६८ हजार रुपये निधी देण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी विशेष बाब म्हणून वाहनांसह १० टँकर खरेदीसाठी १ कोटी २२ लाख ६० हजार रुपये निधी देण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून हा निधी देण्यात आला. दुष्काळ निवारण कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आतापर्यंत सरकारचा ११ कोटी ३७ लाख रुपये निधी आला. विहीर अधिग्रहण, पाणीटंचाई आदी कामांसाठी ९ कोटी ५७ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. दुष्काळ निवारण कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ८ कोटी ८४ लाख तरतूद करण्यात आली. दरम्यान, जालना शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशय या स्रोतातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तेथे आढळलेल्या विहिरीस पाणी लागले आहे. या जलाशयात ४०० चौरस फुट क्षेत्रफळाच्या आणि २० फूट खोल खड्डा घेण्यात आला असून त्यास पाणी लागले आहे. जालना शहरातील १० शासकीय टँकर तेथे भरण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:05 pm

Web Title: gps system will be used for tanker position in jalna
Next Stories
1 निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने आजपासून भूजल अभियान
2 चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे आज व्याख्यान
3 दोन मुलींचा बुडून मृत्यू
Just Now!
X