11 August 2020

News Flash

गुणवाढ प्रकरण खंबीरपणे हाताळल्याबद्दल व्यवस्थापन परिषदेकडून कुलगुरूंचे अभिनंदन

पुणे विद्यापीठामधील पुनर्मूल्यांकन गुणवाढ प्रकरण अत्यंत खंबीरपणे हाताळल्याबद्दल आणि परीक्षा विभागामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबद्दल कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांच्या अभिनंदनाचा

| January 23, 2013 03:28 am

पुणे विद्यापीठामधील पुनर्मूल्यांकन गुणवाढ प्रकरण अत्यंत खंबीरपणे हाताळल्याबद्दल आणि परीक्षा विभागामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबद्दल कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी मंजूर केला. हा ठराव कुलपतींकडेही पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी दिली. विद्यापीठात गेले काही दिवस गाजणाऱ्या पुनर्मूल्यांकन प्रकरणाबाबत व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा झाली. त्या वेळी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी हे प्रकरण खंबीरपणे हाताळल्याबद्दल डॉ. गाडे आणि जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला. हा ठराव कुलपतींकडेही पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुणवत्तासुधार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महाविद्यालयांना अधिक लाभ मिळावेत आणि या महाविद्यालयांचा विकास होण्यास मदत व्हावी या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी करता येतील का, याबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यापीठाचा बहि:स्थ विभाग बंद करण्यात येणार असल्याची चर्चा विद्यापीठामध्ये होती. त्या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेमध्ये असा कोणताही ठराव झालेला नसताना काही सदस्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापन परिषदेमध्ये खंत व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2013 3:28 am

Web Title: grace mark matter strongly handle by vice chancellor
Next Stories
1 नियोजन समितीच्या ३६ जागांसाठी ५३ अर्ज
2 ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’
3 भारतात भ्रष्टाचाराची झळ सामान्यांनाच- हजारे
Just Now!
X