आत्मानुसंधान अडय़ाळ टेकडी ग्रामगीता विश्व विद्यापीठ अंतर्गत ग्रामगीता सुसंस्कारपरीक्षेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने करण्यात आले. यामध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी सहभाग घेतला त्यात अमित उच्च प्राथमिक शाळा, नागपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भूगाव, दिघोरी जिल्हा परिषद शाळा, चिखली जिल्हा परिषद शाळा वरंभा, जिल्हा परिषद शाळा महालगाव, जिल्हा परिषद शाळा पडसाळ, जिल्हा परिषद शाळा भोवरी, जिल्हा परिषद शाळा भोवरी, जिल्हा परिषद टेमसाना, जिल्हा परिषद शाळा पांढरकवडा, जिल्हा परिषद शाळा शिवनी, खैरी, नीलगाय, तलोदी व तत्त्वज्ञान अकाऊंटन्सी, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट श्री गुरुदेव सेवा मंडळ.
ओमनगर, नेहरूनगर सुदामपुरी शाखेतील विद्यार्थी तसेच शाळा-महाविद्यालयांच्या ३ हजार विद्यार्थ्यांंनी यात सहभाग  घेतला होता. परीक्षेसाठी शाळेचे केंद्रप्रमुख रवींद्र डोर्लीकर, कविता मेंघरे, ए.जी पाहुणे, कांबळे, सोनू राधोर्ते, दिनेश भांदककर आदी शिक्षक शिक्षकांनी सहकार्य केले.
या परीक्षेसाठी श्रीगुरुदेव सेवा मंडळ, सेवाधिकारी डॉ. प्रमोद माळवे, प्रा. बलदेव काकडे, सुबोध दाद, विजय कोटांगले पुरुषोत्तम थुटे, राजेंद्र भोंडे यांनी सहकार्य केले.