शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिनाक संगीत अकादमीला राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते अकादमीच्या संचालिका भारती न्यायाधीश यांनी हा धनादेश स्वीकारला. संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, सहसंचालक मीनल जोगळेकर या वेळी उपस्थित होते.
भारती न्यायाधीश संचालित पिनाक संगीत अकादमी गेल्या १० वर्षांपासून मराठवाडय़ाच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून, विविध सांगीतिक उपक्रम राबविते. अकादमीच्या वतीने लहान मुलांसाठी बालगीतांचा ‘धम्माल गाणी’ कार्यक्रम, तसेच मोठय़ांसाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित संगीत मैफलींचे आयोजन केले जाते.
मराठीत धम्माल गाणी भाग एक व दोन, तर हिंदीत ‘धूम धडाक धूम’ व ‘हळवी बोली’ या ऑडिओ अल्बमची निर्मिती   अकादमीने केली आहे. ‘जागो   साईनाथा’ हा अल्बम लवकरच  प्रकाशित केला जाणार आहे.