नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय कार्यालय यांच्यावतीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेतर्फे सिबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महापौरांच्या हस्ते शिवाजी उद्यानातील आणि नाशिकरोड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवराज्य पक्षाच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात झाली. शिवरायांच्या घोषणा देत रॅली सिडको, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, कॅनडा कॉर्नर, गंगापूर नाका, अशोकस्तंभ, आर.के, मेहेर सिग्नल व कन्या विद्यालय मार्गे हुतात्मा स्मारकाजवळ आली. या स्मारकाशेजारील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करून रॅलीचा समारोप झाला. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. संजय जाधव, सचिव रविंद्र जाचक, जिल्हा संपर्क प्रमुख शाम खांडबहाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नाशिक भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयात शिवरायांची ३८३ वी जयंती सोहळा उत्साहात पार पडला. शिवप्रतिमेचे पूजन खा. प्रतापदादा सोनवणे यांच्या हस्ते झाले. शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तिकेचे प्रकाशन नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा चिटणीस संजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी पोवाडा व नाटक सादर केले. याप्रसंगी जिल्हा आयुक्त स्काऊट बी. एन. पवार, राजेंद्र निकम, विभागीय संघटन आयुक्त चंद्रकांत फुलपगारे आदी उपस्थित होते. पंचवटी सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह नथुजी देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अ‍ॅड. राहुल ढिकले व शासकीय विभागीय ग्रंथालय अमरावती येथील निर्गम सहाय्यक रामदास शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाशिक जिल्हा नशाबंदी मंच व राजा छत्रपती ग्रुप यांच्यातर्फेही कार्यक्रम झाला. भिमशक्ती सामाजिक संघटना व भ्रष्टाचार निर्मुलन अभियान संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील होत्या. नगरसेविका वत्सला खैरे, मुश्ताक अहमद शेख, संजय सानप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत