राजकारण्यांना लोक मोठे करतात. हे मोठेपण सेवेसाठी आहे. आम्ही कामे केली नाहीत तर लोकही आम्हाला छोटे करतील. त्यामुळे जनतेने दिलेल्या मोठेपणाचा उपयोग पुढाऱ्यांनी निटनेटका करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्रीक्षेत्र सराला येथे पर्यटन विकासांतर्गत ३ कोटी ४२ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून या विकासकामांचा शुभारंभ भुजबळ यांच्या हस्ते झाला. यावेळी महंत रामगिरी महाराज, पालकमंत्री बबनराव पाचपुते, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आर. एम. वाणी, भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार जयंत ससाणे, कैलास चिकटगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, सिद्धार्थ मुरकुटे, सभापती सुनिता बनकर आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, पर्यटन विकास योजनेंतर्गत श्रीक्षेत्र देवगड, चांदबिबी महाल, चौंडी, चिंचोली व सराला येथील विकास कामांसाठी सुमारे साडेअठरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र सराला बेटाचा विकास सर्वाचे काम आहे. गंगागिरी महाराजांनी भुकेलेल्यांला अन्न व वस्त्र दिले. तरूणांना सन्मार्गाचा उपदेश केला. साईबाबांची ओळखही लोकांना त्यांनीच करून दिली. पंढरपरला जोग महाराजांना अनुग्रह दिला. त्यांचा सप्ताह हा भव्य दिव्य अशा पद्धतीने होतो. कल्पनेपलीकडील हे सर्व काम आहे, असे ते म्हणाले.
जि ल्ह्यात सराला बेटासाठी तीन कोटी ६५ लाख देवगड संस्थानसाठी चार कोटी, चांदबिबी महालासाठी दोन कोटी, चिंचोलीच्या वेदांत संस्थेला तीन लाख, चौंडीसाठी दोन कोटी ६० लाख तसेच जिल्ह्यातील रस्त्यांसाठी २३० कोटी व सरकारी इमारतींसाठी १९५ कोटींचा निधी मंजर केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पालकमंत्री पाचपुते यांनी श्रीक्षेत्र सराला बेट ‘क’ वर्गमध्ये असन लवकरच ‘ब’ वर्ग देण्याचा प्रयत्न करू. ऊनयोजन मंडळ  नाशिक पॅकेजमधन संस्थानकडे येणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीप्रमाणे बेटाचा विकास करावा, अशी सचना केली. महंत रामगिरी महाराज यांनी देवस्थान विकासाचा ४५ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे लोकांच्या मदतीवरच हे काम उभे राहील असे स्पष्ट केले. प्रारंभी प्रस्ताविक कार्यकारी अभियंता सुनिल लोळगे यांनी तर स्वागत माजी आमदार ससाणे यांनी केले. आभार सिराज शेख यांनी मानले. सत्रसंचालन महेश सोनार यांनी केले. यावेळी भाऊसाहेब ठोंबरे, बाबासाहेब दिघे, शरद नवले, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रमोद जगताप, संजय निकम, मिलींद महाजन आदी उपस्थित होते.