18 September 2020

News Flash

पाहुण्यांनी केले यजमानाचे घर साफ

पाहुणे म्हणून आलेल्या जोडप्याने एका महिलेच्या घरातून सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगोला तालुक्यातील हातीद येथे घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा

| November 13, 2013 01:46 am

    पाहुणे म्हणून आलेल्या जोडप्याने एका महिलेच्या घरातून सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगोला तालुक्यातील हातीद येथे घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सारिका संदीप चव्हाण (वय २१) या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील मूळ रहिवासी आहेत. सांगोला तालुक्यातील हातीद येथेही त्यांचे घर आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हातीद येथे त्यांच्या घरात पूनम विकास देवारडे व त्यांचे पती विकास पंडित देवारडे (रा. देवरडी मळा, कदमवाडी, कसबा बावडा, कोल्हापूर) हे जोडपे पाहुणे म्हणून आले होते. घरातील स्वयंपाक खोलीत खुंटीला टांगलेली सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी सुमारे दोन लाखांचा ऐवज असलेली पिशवी या जोडप्याने सारिका चव्हाण यांची नजर चुकवून लंपास केली. देवारडे दाम्पत्याविरुध्द सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2013 1:46 am

Web Title: guest stolen articles worth of 2 lakh
टॅग Stolen
Next Stories
1 राष्ट्रवादीचे दबावतंत्र की, बोराटे-जगताप लढत?
2 माण खटावचा पाणी प्रश्न सोडविणार- मुख्यमंत्री
3 ‘पवनऊर्जा कंपन्या अन् लोकप्रतिनिधींनी पाटण तालुका विकायला काढलाय का?’
Just Now!
X