News Flash

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमाबद्दल ‘करिअर फेयर’मध्ये मार्गदर्शन

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांबाबत मुलांच्या मनात असलेला संभ्रम आणि शंकाकुशंका दूर करण्याची संधी ‘संदेश प्रतिष्ठान’ आणि ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘अंधेरी करिअर फेयर’मध्ये मिळणार आहे. रविवारी

| April 21, 2013 01:21 am

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांबाबत मुलांच्या मनात असलेला संभ्रम आणि शंकाकुशंका दूर करण्याची संधी ‘संदेश प्रतिष्ठान’ आणि ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘अंधेरी करिअर फेयर’मध्ये मिळणार आहे. रविवारी ‘फे यर’च्या समारोपाच्या दिवशी ‘अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे अभ्यासक्रम’, तसेच ‘वाणिज्य आणि व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम’ या दोन महत्त्वांच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अंधेरीतील आझाद रोडवरील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात आयोजित करण्यात आलेल्या या ‘करिअर फेयर’च्या अखेरच्या दिवशी विनामूल्य समुपदेशन, तसेच ५०० हून अधिक अभ्यासक्रमांची माहिती विविध स्टॉल्सवरून घेता येईल. याशिवाय, सायंकाळी ५.३० वाजता नवीन अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमांविषयी तज्ज्ञ संजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. तर वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विविध संधींबाबत ‘शैलेंद्र जे. मेहता मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट’चे डॉ. वरदराज बापट हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विनामूल्य प्रवेश आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठान आणि ‘लोकसत्ता’च्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:21 am

Web Title: guidance in career fair regarding engineering and medical enterance examination course
टॅग : Cet
Next Stories
1 मराठी चित्रपटसृष्टीला गरज, पंख पसरण्याची
2 रंगात रंगुनी वेगळी ‘संस्कार भारती’ची रांगोळी!
3 बोरीवलीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
Just Now!
X