येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने ‘पालकत्व आणि बाल संगोपन’ या विषयावर  पालकांसाठी आयोजित शिबीरात वरिष्ठ सल्लागार श्रीधर बालन व प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ निरुपमा राव यांनी मार्गदर्शन केले.
मुलांनी वाचनाची आवड वाढवली पाहिजे. भारतीय मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण करायची, यासाठी पालकांनी व शिक्षकांनी कसे प्रयत्न करायचे यावर काही पद्धती त्यांनी सांगितल्या. पालकत्व हे एक आव्हान म्हणून पत्करायचे तर त्यात आईबरोबरच बाबांचाही सहभाग असावा हे ओघाने येतेच. जन्माला आलेले प्रत्येक मूल हे बुद्धिमान असते. बुद्धिमत्तेच्या जोडीला अभ्यास आला की माणूस विद्वान होतो आणि दोहोंच्या जोडीला प्रत्यक्ष अनुभव मिळाला की माणूस ज्ञानी होतो. मुलांना वाढविताना आपण आपले पालकत्वाचे कर्तव्य पार पाडतो की नाही हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. पालकांचे काम म्हणजे आपल्या मुलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे, बालसुलभ प्रेरणांना वाट करून देणं, त्यांना यथोचित मार्गदर्शन करणे यालाच पालकत्व किंवा संगोपन म्हणतात असे मत राव यांनी मांडले. संचालक सिध्दार्थ राजगारिया यांनी मुख्याध्यापिका चित्रा जोशी यांची ओळख करून दिली.