News Flash

वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘आरोग्यरथ’ उपक्रम

जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘आरोग्यरथ’ उपक्रमाचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते हिरवा

| January 15, 2013 12:10 pm

जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘आरोग्यरथ’ उपक्रमाचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी पालिका आयुक्त संजय खंदारे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष किरण नाईक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार, मोतिराम पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कामाच्या व्यापात पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अचानक शारीरिक दुखणे सुरू होते. हे लक्षात घेऊन वर्षांतून किमान एकदा पत्रकार, त्यांचे कुटुंबीय तसेच गरजूंची आरोग्य तपासणी व्हावी या हेतूने आरोग्यरथाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली. आरोग्यरथ जिल्ह्य़ातील प्रमुख ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे. कार्डिओग्राम, रक्तामधील साखर या तपासण्या विनामूल्य करण्यात येतील. तसेच हृदयरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्य़ातील अधिकाधिक पत्रकारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नीलिमा पवार, यशवंत पवार, मोतिराम पिंगळे, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील आदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:10 pm

Web Title: health rath by medical news
Next Stories
1 विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणात अधिव्याख्यात्याला सौम्य शिक्षा
2 एसटीच्या २२ आगारांना ‘नकारात्मक’तेचे गतिरोधक
3 पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला
Just Now!
X