News Flash

अकोला मनपा स्थायी समिती निवडीची आज सुनावणी

मनपाची निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणे आवश्यक असतांना निवडणूक होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटूनही

| July 24, 2013 09:28 am

मनपाची निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणे आवश्यक असतांना निवडणूक होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप स्थायी सदस्यांची निवड झालेली नाही.
 मनपातील खालच्या दर्जाचे राजकारण याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. स्थायी सदस्य निवडीचा वाद खंडपीठात गेला आहे. त्या प्रकरणी २४ जुलैला सुनावणी होणार आहे.
अकोला मनपाची निवडणूक होऊन बराच कालावधी लोटला आहे. एक वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नव्याने स्थायी समितीच्या स्थापनेसाठी एक विशेष  सभा बोलावण्यात आली होती. त्या सभेत आठ सदस्यांची निवड करण्यात आली. परंतु, ही प्रक्रिया नियमबाह्य़ असल्याचा आरोप करून विरोधी भाजपने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणी आता २४ जुलैला सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे साऱ्या मनपाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 9:28 am

Web Title: hearing on amc standing committee
Next Stories
1 फ्रेण्ड्स कॉलनीत भर दिवसा खाणावळ मालकावर गोळीबार
2 चार दिवसांमध्ये २० लाखांचे नुकसान एसटीला पावसाचा जबर फटका
3 चंद्रपूरसह जिल्ह्य़ाला पुन्हा पावसाचा तडाखा
Just Now!
X