‘फॅन्सी नंबर प्लेट’ असणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यासंदर्भातील याचिकेवर जून महिन्यात सुनावणी होणार आहे.
  ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणीला आली होती. परंतु याचिकाकर्ता वकिलाची प्रकृती बरी नसल्याने आज न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठाने यावरील सुनावणी न्यायालयाच्या सुटीचा कालावधी संपल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे.
अशी वाहने पोलीस आणि आरटीओकडून ताब्यात घेतली जाऊ शकतात का, अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीत सरकारला केली होती.
केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार पोलीस आणि आरटीओला ‘फॅन्सी नंबर प्लेट’ असलेल्या वाहनांवर कारवाई करता येते. परंतु दंड आकारून हे वाहन सोडून दिले जाते. पण ‘नंबर प्लेट’ तशीच राहते. त्यामुळे सुधारणा होईस्तोवर वाहन ताब्यात घेता येईल का, अशी विचारणा झाली आहे.