29 September 2020

News Flash

मुस्लीम समाजाच्या विकासासाठी उच्चशिक्षितांनी पुढाकार घ्यावा – राणे

विदर्भ मुस्लीम इन्टलेक्च्युअल फोरमतर्फे आयोजित ‘भारतीय राजकारणात मुस्लीम समाजाचा सहभाग’ या विषयावर परिसंवाद व राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

| December 22, 2012 01:31 am

विदर्भ मुस्लीम इन्टलेक्च्युअल फोरमतर्फे आयोजित ‘भारतीय राजकारणात मुस्लीम समाजाचा सहभाग’ या विषयावर परिसंवाद व राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उच्चशिक्षित लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करून राणे यांनी समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण होते. त्यांनी मुस्लीम फोरमच्या कार्याची प्रसंशा केली. प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम.एफ. शेख यांनी मुस्लीम समाजाच्या आजच्या स्थितीबद्दल माहिती दिली. फोरमचे सचिव परवेज सिद्दीकी, आमदार दीनानाथ पडोळे व समीर मेघे यांनीही यावेळी मुस्लीम समाजाच्या सद्यस्थितीवर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे पा्रस्ताविक फोरमचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार यांनी केले. संचालन प्राचार्या जाफर खान यांनी, तर डॉ. आरीफ खान यांनी आभार मानले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी अ. हमीद, कुतुब जफर, जाकीर खान, दाऊद शेख, दीपक पटेल, नाजीम शेख, गफ्फार बेग, आभा पांडे, तनवीर अहमद, शीला मोहड, डॉ. प्रशांत चोपडा, बाबा अली, साजिद अली, साजा सेठ आदींनी सहकार्य केले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2012 1:31 am

Web Title: high educated should take lead for muslim community development rane
टॅग Development,Rane
Next Stories
1 राजभवनातील जैवविविधता उद्यानाला मुख्य सचिवांची भेट
2 शेवाळकर संकुलासाठी जागेचा प्रस्ताव देण्याची सूचना
3 गोंदिया जिल्ह्य़ातील झाशीनगर सिंचन योजना निधीअभावी रखडली
Just Now!
X