जेएनपीटी बंदरावर आधारित िहद टर्मिनल या द्रोणागिरी नोडमधील कामगारांना रायगड श्रमिक संघटना या केंद्रीय कामगार संघटना सीटूचे नेते कॉम्रेड भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने ४० टक्केवेतनवाढ देण्याचा करार केला आहे. िहद टर्मिनलमधील वेतन करारावर श्री सदगुरू कृपा फ्रेट सíव्हसेसच्या संचालिका सेजल कडू यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी शशी यादव, सतीश खरात, कुदरत मुलानी, अर्जुन गोडसे, शांताराम तिकोने आदी कामगार नेते तसेच िहद टर्मिनलचे एच. आर. व्यवस्थापक अमोल सावंत आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 1:29 am