कृष्णा नदीतून सन १९९९ मध्ये येथील मंगळवार पेठेतील युवकांना सापडलेला सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा साडेआठ फूट लांबीचा व पाच फूट रुंदीचा भरीव लोखंडी, भव्य नांगर चोरीस गेल्याची घटना घडली. त्या संदर्भात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अवजड नांगरावर १८५५ असे साल कोरण्यात आले होते. त्यावर ब्रिटिश सरकारची काही मुद्राही छापील स्वरूपात होती. तो नांगर ऐतिहासिक असल्याची नोंद पुरातत्त्व खात्यानेही घेतली होती. येथील युवकांनी १४ वर्षांपासून जतन केलेला हा नांगर येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात ठेवण्यात आला होता. तो चोरटय़ांनी लंपास केला. यापूर्वी तीन वेळा त्याच्या चोरीचा प्रयत्न झाला होता. युवकांच्या प्रसंगावधानाने तो अपयशी ठरल्याचे वृत्त आहे.