कृष्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांना २९ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी उदय मोरे, संचालक ब्रम्हानंद पाटील, महिंद्र मोहिते, सुभाष शिंदे, अशोकराव जगताप, संदीपराव पाटील, उदय शिंदे, संभाजीराव दमामे, पांडुरंग पाटील, वसंतराव साळुंखे, सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले की, सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी करता येतो हे बापूंनी घेतलेल्या विविध निर्णयातून दिसून येते. बापूंच्या धोरणांचा महाराष्ट्राच्या जीवनावर कायमचा ठसा उमटलेला आहे. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बापूंना सर्वतोपरी जाण होती.
उदय मोरे म्हणाले की, स्वर्गीय राजारामबापूंनी मंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली. लोकाभिमुख, स्वच्छ कारभार राबविल्याने जनतेचे ते लोकनेते झाले.