होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, शाखा नागपूरतर्फे रविवारी दुपारी ४.३० वाजता झाशी राणी चौकातील मोरभवनात होमिओपॅथी डॉक्टरांचा विदर्भस्तरीय मेळावा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे अधिष्ठाता डॉ. दादासाहेब कविश्वर, हिम्पामचे राज्याध्यक्ष डॉ. सोमनाथ गोसावी, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश झामड, बारामती येथील एमसीएचचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, हे मान्यवर औषधसास्त्र अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ स्तरावरील कार्यवाही, निरामय महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात होमिओपॅथीचे योगदान व डॉक्टरांची भूमिका, वैद्यकीय सेवा व शिक्षण यात सुधारणा करण्याची गरज, महाराष्ट्रात होमिओपॅथीच्या स्वतंत्र संचालनालयाची गरज आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटित होण्याची गरज, या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्रातील केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर निवडून गेलेले सदस्य डॉ. अरुण भस्मे, डॉ. शांतीलाल देसरडा, डॉ. डी.बी. चौधरी, डॉ. रवींद्र भोसले, डॉ. शिवदास भोसले, डॉ. कांचन देसरडा, डॉ. किशोर मालोकर, डॉ. पवन डोंगरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त होमिओपॅथी डॉक्टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. डी.बी. चौधरी, डॉ. रवींद्र पारख, डॉ. राजेश रथकंठीवार, डॉ. सुभाष राऊत यांनी केले आहे.