वायुसेना मुख्यालयाचे असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ (मेंटेनन्स प्लान) एअर व्हाईस मार्शल दत्तात्रेय केशव पांडे यांना राष्ट्रपती भवनात एका समारोहात राष्ट्रपतींच्या हस्ते अति विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
पांडे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या करिअरमध्ये अनुरक्षण कमान मुख्यालय आणि वायुसेना मुख्यालय पदभार प्रसंगी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आय.आय.टी. खडगपूर येथून इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन व रक्षा सेवा स्टॉफ कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर रूसी भाषेचा डिप्लोमा प्राप्त केला. पांडे यांना २००४ मध्ये विशिष्ट सेवा पदक तसेच १९९२ व १९९५ मध्ये चीफ एअर स्टाफतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्नानित करण्यात आले. २००५ ते २००७ दरम्यान दक्षिण पश्चिम वायू कमानमध्ये मुख्य इंजिनिअरिंग अधिकाऱ्याच्या रूपात सहा लढाऊ स्क्वाड्रनोच्या संचालनासाठी प्रभावशाली अनुरक्षण प्रणालीचे निर्धारण केले. त्यांनी भारतीय वायुसेनेतर्फे मोठय़ा संख्येत हत्यार परीक्षणाच्या संचालनातही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बेस रिपेअर डेपो, मध्यम लँडिंग हेलिकॉप्टर व एन-३२ व मिग-२९ विमाने प्रगती करत आहेत. त्यांनी विविध युनिटमध्ये गुणवत्ता प्रबंधन प्रणालीमध्ये जटिल परियोजना लागू केल्या आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तापूर्ण निर्णयामुळे २०१०-१२ साली भारतीय वायुसेनेसाठी विदेशी मुद्रामध्ये जवळपास ४०० कोटी रुपयाची बचत झाली आहे.

Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”