सातारा जिल्हयातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या दि वाई अर्बन को-ऑप. बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या ‘वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या सोहळयात भारतीय रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी संचालक एस. करुप्पासामी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष अर्जुनराव जाहेर-पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. यू. तराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, सरव्यवस्थापक सदानंद दीक्षित यांनी पुरस्कार स्वीकारला.
वाई अर्बन बँकेला ९२ वर्षांची उज्ज्वल परंपरा असून, बँक कायमच ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच रिझव्र्ह बँक व सहकार खात्याने घालून दिलेले सर्व निकष पाळत असते. सन २०१२-१३ मध्ये बँकेच्या ठेवी व कर्जामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. वसुलीच्या नियोजनामुळे बँकेला एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळाले आहे. बँकेची आíथक स्थिती, नफा, कर्ज वसुली व सामाजिक कार्यातील योगदान या निकषांवर बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या वेळी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण देव, अॅड. सूर्यकांत खामकर, सीए. चंद्रकांत काळे, मदनशेठ ओसवाल, प्रा. डॉ. एकनाथ पोळ, सीए. सारंग कोल्हापुरे, विवेक भोसले, माजी अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल, माजी उपसरव्यवस्थापक विद्याधर तावरे उपस्थित होते.
बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकार, शैक्षणिक, सामजिक, तसेच बँकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सभासदांनी बँकेचे अभिनंदन केले.