06 August 2020

News Flash

‘हौसला’तर्फे पांडवलेणी डोंगरावर ध्वजवंदन

शहरातील हौसला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहाटे पांडवलेणी डोंगरावरील सर्वाधिक उंच टोकावर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

| January 29, 2015 07:15 am

शहरातील हौसला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहाटे पांडवलेणी डोंगरावरील सर्वाधिक उंच टोकावर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्र्या कार्यकर्त्यांसह अनेक युवा व बालमंडळी उपस्थित होती. सकाळी सर्व पांडवलेणीच्या पायथ्याशी जमल्यावर त्यांनी परिसरातील सर्व कचरा, प्लास्टिक पिशव्या, कागद, काचेच्या बाटल्या आदी सुमारे ३० गोण्या भरून जमा केल्या. त्यानंतर सर्वानी पांडवलेणीच्या वरच्या टोकाला जावून ध्वजवंदनाचा कार्यक्रम केला. हौसला संस्थेच्या तेजस चव्हाण, आशीष लकारिया, अक्षय धोंगडे, अनिकेत झवर, यश निकम आदींसह इतर कार्यकर्त्यांनी यापुढेही प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2015 7:15 am

Web Title: housla institute organise flag ceremony on pandavleni in nashik
Next Stories
1 शासकीय गोदामातून कोटय़वधीचे धान्य गायब
2 ..अखेर सायंकाळी फोनवरून पुरस्कारार्थीना निरोप
3 अवांतर शिक्षण देणारी सिन्नरची अनोखी शाळा
Just Now!
X