आज बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाची हेल्पलाईन दुपारी १ वाजतापासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असून गुणपत्रिका मात्र आठ दिवसांनी मिळणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. विदर्भात २ लाख, ८४ हजार, १३२ परीक्षार्थींचे भवितव्य ठरणार आहे.
दुपारी १ वाजता नेटवर निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाच्या संकेतस्थळावर ँ३३स्र् / ें३१ी२’३.ल्ल्रू.्रल्ल. – ६६६. ेुं२ँी२ूं ्रल्ल. – े‘ू’. े२्रू३ निकाल पाहता येईल. बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक निकालही एसएमएसद्वारे उपलब्ध होऊ शकेल. बी.एस.एन.एल. मोबाईलसाठी ेँँ२ू > २ीं३ ल्ल.हा शॉटकोड ५७७६६ या क्रमाकांवर पाठवून निकाल मिळू शकेल. शिवाय १ी्िरऋऋूे च्या मोबाईल शॉर्टकोर्ड वरून एसएमएसद्वारे निकाल उपलब्ध होऊ शकेल. याकरिता ेँँ२ू< २ीं३ ठ> हा शम्ॉटकर्ट ५७३३३५००० या क्रमाकांवर पाठवून निकाल मिळू शकेल. कमी गुण मिळालेल्या व अनुतीर्ण विद्यार्थ्यांना हेल्पलाईन निकाल सांगण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भात नागपूर विभागीय मंडळातून ४११ परीक्षा केंद्रांवर १ लाख ४१ हजार ४५० नियमित आणि १५ हजार ६८२२९ जुन्या अभ्यासक्रमानुसार विद्याथ्यार्ंनी दिली आहे. १ लाख ५७ हजार १३२ विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार ५५८ विद्यार्थी व ७१ हजार ८९२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १ लाख ४१ हजार ४५० विद्यार्थी नियमित असून १५ हजार ६८२ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी आहेत. विज्ञान शाखेत ६० हजार ३९७, वाणिज्य शाखेत २१ हजार ६९५ कला शाखेत ६६ हजार ६९८ व द्विलक्षी अभ्यासक्रमात ८ हजार ३४२ विद्याथ्यार्ंनी परीक्षा दिली. परीक्षाथिर्ंना गुणपत्रिकाचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात ४ जून रोजी दुपारी ३ नंतर करण्यात येणार आहे. ज्या विद्याथ्यार्ंना गुणपडताळणी करावयाची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर १५ जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची तपासणी करायची असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा मंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर १५ जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांंना ऑक्टोबर २०१५ मध्ये परीक्षेसाठी आवेदन पत्र भरावयाचे आहे, त्यांनी नियमित शुल्कासह १५ जूनपर्यंत आणि विलंब शुल्कासह १८ जूनपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात भरावयाचे आहे. निकालासंबंधी नागपूर, भंडारा वर्धा, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्य़ांसाठी विभागपातळीवर समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विशाल गोस्वामी (२५६५४०३, २५५३३६०, २५५३४०१), पी. एस तुरस्कर (९४२३१७७१८९), मिलिंद रंगारी (९४०४८६०७३५), टी. बी. कटरे (९८२३६४८८१८), आर.एन रहाटे (७५८८८९०१८७), सतीश पाटील (९४२१९१४३५३), डी. एम जवंजाळ (९४२१८१७०८९) या क्रमांकावर संपर्क साधाावा. परीक्षेच्या निकालानंतर विद्याथ्यार्ंनी मागणी केल्यास त्यांना उत्तर पत्रिकांची छायाप्रत विहित शुल्क प्राप्त करून घेता येईल. तसेच ज्या विद्याथ्यार्ंना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी नागपूर विगागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
अमरावती विभागीय मंडळाअंतर्गत पाच जिल्ह्यांमधील ४३१ परीक्षा केंद्रांवरून सुमारे १ लाख २७ हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अमरावती जिल्ह्यातून ३५ हजार ७०७, अकोला जिल्ह्यातील २२ हजार ७९१, यवतमाळ जिल्ह्यातील २६ हजार ८३०, बुलढाणा जिल्ह्यातील २७ हजार ५६४ आणि वाशीम जिल्ह्यातील १४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.