महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी उत्कृष्ठ यश संपादन केले असून शहरी भागातील महाविद्यालयांनी काही प्रमाणात ग्रामीण भागापेक्षा गुणवत्तेत आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचा निकाल ९९.०७ टक्के लागला. सूरज जाधव ९४.९२ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला.
ऐश्वर्या पाटील (९४.६१) द्वितीय तर, आदेश जगताप (९४) तृतीय आला. महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखेचा निकाल १०० टक्के लागला. वृषभ द्विवेदी (८२.३०) प्रथम, सुजाता लभडे (८१.६९) व्दितीय तर, कोमल बडदाळे (८०.९२) तृतीय आली. महाविद्यालयाच्या कला विभागाचा निकाल ७९.४४ टक्के लागला. शाम गुळवे (८४.३०) प्रथम, निकिता मोहिते द्वितीय व वैभव मुळे तृतीय आले. सिडकोतील वावरे महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा निकाल ८७.५७, कला शाखेचा ७१.२३ तर, वाणिज्य शाखेचा निकाल ८०.८१ टक्के लागला. विज्ञान शाखेत तेजस्वीनी आंधळे, किसन भारस्कर, गायत्री दशपुते हे अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आले. कला शाखेतील पहिल्या तिघांमध्ये ज्योती गायकवाड, रिना गुंजाळ, अस्मिता कांबळे यांचा समावेश असून वाणिज्य शाखेत अश्विनी उपाडे, प्रकाश कारलकुंटी, सोनाली जाचक यांनी पहिल्या तिघांमध्ये स्थान मिळविले.
शहरातील आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमीनेही नेत्रदीपक यशाची परंपरा कायम राखली. त्यांचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान आणि वाणिज्य शाखा मिळून सर्व ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत विधी चोकानी (८७.२३) प्रथम आली. निशिता जैन (८६.३१) व्दितीय तर, वैभवी उगले (८५.२३) तृतीय आली. विज्ञान शाखेत शर्मीन करंजिया (८५.६९) प्रथम ओमेश पटेल व्दितीय तर, आकांक्षा सोंजे तृतीय आली.
मनमाडच्या बारावी केंद्राचा निकाल ६७.८४ टक्के लागला. मरेमा विद्यालयाच्या शास्त्र शाखेची फारुकी जिकरा रईस ५२६ गुण मिळवून सर्वप्रथम आली. आरती देवकर व्दितीय तर, अभिषेक गोयल तृतीय आले. या शाळेचा निकाल ९६.५५ टक्के लागला.
छत्रे न्यू इंग्लिश स्कुलचा निकाल ९८.८२ टक्के लागला. या शाळेतून नेहा बेदमुथा (४९९) प्रथम, निवेदिता पवार व्दितीय तर, योगिता झाल्टे तृतीय आले. एम.जी. महाविद्यालयाचा निकाल ५८.४१ टक्के लागला.