15 August 2020

News Flash

महापौर-उपमहापौर निवडीचा जल्लोष

महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांची निवड जाहीर होताच आघाडीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. महापौरांची शहरातून उघडय़ा जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात

| December 31, 2013 02:04 am

महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांची निवड जाहीर होताच आघाडीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. महापौरांची शहरातून उघडय़ा जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सोमवारी सकाळी महापालिकेच्या सभागृहात नवा महापौर व उपमहापौराची निवड झाली. ही निवड होत असतानाच जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे निरीक्षक आमदार शरद रणपिसे, आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, डी. एम. कांबळे आदी नेते येथे आले. या सर्वानी नव्या पदाधिका-यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पिचड व विखे यांनीच नंतर दोन्ही पदाधिका-यांना त्यांच्या दालनात नेऊन स्थानापन्न केले. या नेत्यांनी या वेळी पत्रकारांशीही संवाद साधला.
नव्या पदाधिका-यांची निवड जाहीर होताच मनपा कार्यालयासमोर जमलेल्या आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. अनेक कार्यकर्ते गुलाल घेऊनच मनपा कार्यालयात शिरले. बाहेरही फटाक्यांची मोठी आतषबाजी सुरू होती. नवे महापौर संग्राम जगताप यांची येथून उघडय़ा जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. शहरात आल्यानंतरही बराच वेळ ही मिरवणूक सुरू होती.
तत्पूर्वी आघाडीचे ३६ नगरसेवक रविवारी रात्री नाशिकहून नगरला दाखल झाले. त्यांना हुंडेकरी लॉन्सवर ठेवण्यात आले होते. येथे सोमवारी सकाळी या नगरसेवकांची बैठक झाली. वरील सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते. पिचड व विखे यांनी या नगरसेवकांना या वेळी विविध सूचना केल्या. येथून एका बसने हे सर्व नगरसेवक सकाळी १०.४५ वाजता मनपात आले.
याच दरम्यान भाजप-शिवसेना युतीचेही नगरसेवक एकत्रितरीत्या मनपात आले. येथे येण्यापूर्वी झालेल्या त्यांच्या बैठकीत महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित झाले होते. सभागृहात सदस्यांची एक बाजू सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी व्यापली, दुसऱ्या बाजूला पहिल्या रांगेपासून विरोधी नगरसेवक बसले होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2013 2:04 am

Web Title: huge celebration with procession of mayor and deputy mayor selection
टॅग Selection
Next Stories
1 महापौरपदी जगताप, कोतकर उपमहापौर
2 कर्मचा-यांमुळे बीएसएनएल प्रगतिपथावर
3 वाहतूक पोलिसांची कर्जतला मनमानी
Just Now!
X