पोलिओ आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीरकण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रविवारी यवतमाळ जिल्हय़ात चांगला प्रतिसाद मिळाला. मोहिमेच्या शहरी भागाचा शुभारंभ भोसाच्या आरोग्य उपकेंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख तसेच आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी  बालकांना डोज पाजून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मंदा गाडेकर, यवतमाळ पंचायत समितीच्या उपसभापती नयना येलके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश चिंचोळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश रचकुंटवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर, गटविकास शल्य चिकित्स डॉ. आडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर, गटविकास अधिकारी मत्रे, भोसाच्या सरपंच मीना जिवने, सदस्य आशा तरोणे आदी उपस्थित होते. यवतमाळ शहरातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सकाळी अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्या हस्ते झाला.
पोलिओ निर्मूलनाच्या ध्येयपूर्तीसाठी १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. यावर्षी ही मोहीम दोन टप्प्यात राबविली जात आहे. ० ते ५ वष्रे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस पाजण्यात येत आहे. यासोबतच या मोहिमेतून सुटलेल्या बालकांना ग्रामीण आणि शहरी भागात विशेष लसीकरण मोहीम राबवून लस पाजण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाभरात २ हजार ५७५ बुथ ठेवण्यात आले आहे. साधारणत: पाच वर्षां आतील २ लाख ६३ हजार ७४१ बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात २३०२ तर शहरी भागात २७३ कर्मचारी या कामासाठी नेमण्यात आले आहे. लसीकरण मोहीम राबविताना संपूर्ण जिल्हय़ात एकाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. तसेच जिल्हय़ातील बालकांसह पर जिल्हय़ातून येणाऱ्या बालकांचेही लसीकरण व्हावे यासाठी ठिकठिकाणी केंद्र ठेवण्यात आले आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा