जिल्हय़ात सलग चार दिवस मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे. चालू वर्षी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी टक्केवारी १५.१ आहे. गतवर्षी हे प्रमाण १.४६ होते.
गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच जिल्हय़ात मृगाचा समाधानकारक पाऊस पडल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लवकर होण्यासाठी अनुकूल चित्र तयार झाले आहे. जिल्हय़ात आतापर्यंत झालेला पाऊस मिमीमध्ये, कंसातील आकडे पावसाच्या सरासरीचे. हिंगोली निरंक (११९.१३), वसमत ४.७१ (१६४.६९), कळमनुरी १.१६ (११४.४७), औंढा नागनाथ १.१२ (१४०.१२) व सेनगाव ५.३३ (१४२.८२). एकूण सरासरी ६८०.२३ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेला ६४.४६ मिमी नोंद होती.