14 November 2019

News Flash

परभणीत पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

परभणी तालुक्यातील शिर्शी बु.येथे पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने निर्घृण खून केल्यानंतर पती दशरथ पाराजी वैद्य(वय ३२) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल

| February 24, 2014 01:40 am

परभणी तालुक्यातील शिर्शी बु.येथे पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने निर्घृण खून केल्यानंतर पती दशरथ पाराजी वैद्य(वय ३२) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल शनिवारी घडली. याप्रकरणी मयत पतीविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिर्शी बु.येथील शेतकरी दशरथ पाराजी वैद्य याने पत्नी शालूबाई उर्फ दैवशाला वैद्य(३०) हिचा शनिवारी दुपारी डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर दशरथ याने विषारी औषध प्राशन केले. दैवशाला वैद्य हिच्या खुनाची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तेव्हा दशरथ हा विषारी औषध प्राशन केल्याने घरासमोरच्या बलगाडीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यास तत्काळ पोलिसांनी उपचारासाठी परभणीच्या सामान्य रुग्णालयात पाठविले.  परंतु परभणीला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच दशरथ वैद्य याचा मृत्यू झाला. या घटनेने शिर्शी बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे.
मयत दैवशालाबाई हिचा भाऊ िलबाजी संभाजी लांडे रा.मालेवाडी यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली की, दशरथ वैद्य हा शेतातील विहिरीच्या बांधकामासाठी माहेराहून एक लाख २५ हजार रुपये घेऊन ये म्हणून दैवशालाचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. यातूनच दशरथने कुऱ्हाडीचे घाव घालून दैवशालाचा खून केला. याप्रकरणी मयत दशरथविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कौटुंबिक कलहातून की अन्य कारणाने घडली याचा तपास पोलीस करीत आहेत.

First Published on February 24, 2014 1:40 am

Web Title: husband suicide after wife murder