04 July 2020

News Flash

तरुणीच्या फसवणुकीबद्दल दापंत्याला पोलीस कोठडी

प्रियकरावर केलेली करणी जादूटोण्याने दूर करून जीवन सुंदर बनवतो, असे सांगून एका दांपत्याने वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा येथे

| January 23, 2013 03:29 am

प्रियकरावर केलेली करणी जादूटोण्याने दूर करून जीवन सुंदर बनवतो, असे सांगून एका दांपत्याने वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा येथे उघडकीस आला आहे. या दांपत्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने गुरुवापर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
बेहरोझ दस्तुर सेहगल (वय ४२), फिरोज शावक दादाछांजी (वय ५४, रा. दोघेही- एस. पी. रेसिडेन्सी, फुरुसुंगी) असे या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्याकडून जादूटोण्यासाठीच्या पाच बाहुल्या, दोन हजार दोनशे रुपये, युको बँकेचे दोन धनादेश, पुस्तके, ‘कॅलिफोर्निया टॅरो कार्ड्स’ चे पुस्तक, १८ हजारांचा रुफिर्यादीने दिलेला धनादेश जप्त केला आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथील २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. जादूटोण्याचे प्रशिक्षण कॅलिफोर्नियातून घेतल्याचे बेहरोझ सांगते.
ती मुंबईहून वर्षांपूर्वी पुण्यात आली. तिने कोंढवा येथे कार्यालय उघडले आहे. त्याची जाहिरातही देण्यात आली होती. फसवणूक झालेली तरुणी  व तिच्या प्रियकरामध्ये वाद होत असल्यामुळे तिने बेहरोझ हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपींनी खोटे अश्वासन दिले. त्यासाठी ५२ हजार रुपये घेतले. काही महिने झाले तरी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे काहीच घडले नसल्याचे दिसल्यावर कार्यालयात जाऊन विचारणा केली. त्यावेळी दादाछांझी याने शिवीगाळ करून पोलिसांकडे तक्रार देण्याची धमकी दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2013 3:29 am

Web Title: husband wife in police custody for cheating youth
टॅग Cheating
Next Stories
1 गुणवाढ प्रकरण खंबीरपणे हाताळल्याबद्दल व्यवस्थापन परिषदेकडून कुलगुरूंचे अभिनंदन
2 नियोजन समितीच्या ३६ जागांसाठी ५३ अर्ज
3 ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’
Just Now!
X