उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन हैदराबाद आणि कोटा स्थानकांदरम्यान जून महिन्यात विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या धावणार आहेत.
०७००३ हैदराबाद- कोटा ही विशेष गाडी जून महिन्यात दर मंगळवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी हैदराबाद स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, बुधवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी कोटा येथे पोहचेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता बल्लारशाह आणि रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी नागपूर स्थानकावरून सुटेल. जून महिन्याच्या ४, ११, १५ व २५ तारखांना हैदराबादहून निघणार आहे. ०७००४ कोटा- हैदराबाद ही विशेष गाडी जून महिन्यातील दर बुधवारी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी कोटा स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हैदराबादला पोहचेल. जून महिन्याच्या ५, १२, १९ व २६ तारखेला कोटय़ाहून निघणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी, अनुक्रमे ६, १३, २० व २७ तारखेला सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी नागपूरहून व दुपारी १२ वाजता बल्लारशाह येथून सुटेल. या विशेष गाडीला रामगंज मंडी, भवानी मंडी, शामगड, नागदा, उज्जन, शुजालपूर, सिहोर, भोपाळ, हबीबगंज, इटारसी, नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशहा, सिरपूर कागजनगर, रामगुंडम, जम्मीकुंटा, काझीपेठ व सिकंदराबाद या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे राहतील. वातानुकूलित प्रथम श्रेणी- कम-एसी टू टियरचा १, एसी टू टियर व एसी थ्री टियरचा प्रत्येकी १, शयनयान श्रेणीचे १०, सामान्य अनारक्षित श्रेणीचे २ आणि दोन एसएलआर अशा एकूण १७ डब्यांसह धावणाऱ्या या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.